देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंनी एकाच वेळी केला शिवसेनेवर घणाघात

देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंनी एकाच वेळी केला शिवसेनेवर घणाघात

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 9 ऑगस्ट : 'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असेल तर मी कुठेही जाउन आंदोलन करायला तयार आहे. पण त्यासाठी संजय राऊत यांना माझी गरज का वाटावी? ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते सरकारमध्ये आहेत त्या काँग्रेस आमदारामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावमधून काढला गेला, याचा जाब आधी त्यांनी काँग्रेसला विचारावा,' असं म्हणत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे.

बेळगावातील एका गावात असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सरकारने हटवल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. पुतळा हटवल्याप्रकरणी कर्नाटकातील भाजप सरकारवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्याला आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते आज नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम हॉस्पिटलमधल्या कोविड टेस्ट लॅबच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्गात आले होते.

नारायण राणेही ठाकरे कुटुंबावर बरसले

'बाप बेटे कॅबिनेटला नसतात पण पार्ट्यांना असतात. सहा महिने झाले एकाही कॅबिनेटला मुख्यमंत्री नाहीत. हे सरकार पाहुणे आहे पिंजऱ्यातले .. ते लवकरच उडून जाईल. मातोश्री हा पिंजरा आहे,' असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

लॉकडाऊनविषयी फडणवीस यांची भूमिका

'महाराष्ट्रात आता लॉकडाऊन ठेउन चालणार नाही. आपल्याला अनलॉकमध्येच राहिलं पाहिजे. जास्तीत जास्त गोष्टी खुल्या करुन कोरोनाची काळजी घेत पुढे नाही गेलो तर अर्थव्यवस्था आणखी कोलमडून खूप गंभीर परिस्थिती निर्माण होईल,' असं म्हणत सिंधुदुर्गात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 9, 2020, 9:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading