विशाल रेवडेकर, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग, 19 जानेवारी : कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचे (Kudal Nagar Panchayat Election) निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत एकूण सहा जागांचे निकाल हातील आले असून भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांना हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
कुडाळ नगरपंचायत
प्रभाग क्र. 4 बाजारपेठ (सर्वसाधारण महीला)
1) रेखा काणेकर (भाजप)
2) श्रुती वर्दम (शिवसेना) विजयी
3) सोनल सावंत (काँग्रेस)
4) मृण्मयी धुरी (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 5 कुडाळेश्वर वाडी (सर्वसाधारण)
1) अभिषेक गावडे (भाजप) (विजयी)
2) प्रवीण राऊळ (शिवसेना)
3) सुनील बांदेकर (अपक्ष)
4) रमाकांत नाईक (मनसे)
5) रोहन काणेकर (काँग्रेस)
प्रभाग क्र. 6 गांधीचौक (सर्वसाधारण महीला)
1 प्राजक्ता बांदेकर (भाजप) (विजयी)
2) देविका बांदेकर (शिवसेना)
3) शुभांगी काळसेकर (काँग्रेस)
4) आदिती सावंत (अपक्ष)
वाचा : कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज विजय, रोहित पवारांचं निर्विवाद वर्चस्व
प्रभाग क्र. 7 डॉ. आंबेडकर नगर (सर्वसाधारण)
1) विलास कुडाळकर (भाजप) (विजयी)
2) भूषण कुडाळकर (शिवसेना)
3) मयूर शारबिद्रे (काँग्रेस
प्रभाग क्र. 8 मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महीला)
1) मानसीसावंत (राष्ट्रवादी काँग्रेस) (विजयी)
2) रेवती राणे (भाजप)
3) आफरीन करोल (काँग्रेस)
निवडणूक निकालांचे अपडेट्स
चंद्रपुरातील सावली नगरपंचायतीच्या 17 पैकी 10 जागांवर काँग्रेस तर 2 जागी भाजप विजयी
प्रभाग1 - प्रफुल वाळके(कांग्रेस)
प्रभाग 2- प्रीतम गेडाम(कांग्रेस)
प्रभाग-3 सीमा संतोषवार(कांग्रेस )
प्रभाग-4 -विजय मूत्यालवार (कांग्रेस)
प्रभाग-5- प्रियांका रामटेके(कांग्रेस)
प्रभाग-6 ज्योती शिंदे(कांग्रेस)
प्रभाग-7 ज्योती गेडाम(कांग्रेस)
प्रभाग-8 नितेश रस्से(कांग्रेस)
प्रभाग-9 नीलम सुरमवार (भाजपा)
प्रभाग 10 शारदा गुरुनुले (भाजपा)
प्रभाग 11 साधना वाढई(कांग्रेस)
प्रभाग12 सचिन संगीळवार(कांग्रेस)
जळगावातील बोदवड नगरपंचायत नगरपंचायत 3 जागेचा निकाल जाहीर
राष्ट्रवादी-2
शिवसेना -1
शिवसेना उमेदवार- रेखा गायकवाड
राष्ट्रवादी-1 कडूसिंग पाटील -
2 योगिता खेवलकर
निफाड पहिली फेरी
प्रभाग 1 अरुंधती विजय पवार - बसपा
प्रभाग 2 किशोर शिवाजी ढेपले - अपक्ष
प्रभाग 3 अनिल रंगनाथ कुंदे शिवसेना
प्रभाग 4 शारदा नंदकुमार कापसे - शहर विकास आघाडी
प्रभाग 5 पल्लवी महेश जंगम - काँग्रेस
प्रभाग 6 साहेबराव काळू बर्डे - शहर विकास आघाडी
हिंगणा नगर पंचायत नागपूर जिल्हा (विजयी उमेदवार)/ पक्ष
प्रभाग 1 मेघा भगत/ राष्ट्रवादी
प्रभाग 2 सुचिता चामाटे/ भाजप
प्रभाग 3 छाया भोसकर/ भाजप
प्रभाग 4 दीपाली पुंड/ राष्ट्रवादी
दोन टप्प्यात मतदान आज मतमोजणी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर त्यापूर्वी उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे पार पडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shiva sena, Zilla Parishad, महाराष्ट्र