जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: जेवणातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची मृत्यूशी झुंज सुरू, बीडमधील धक्कादायक घटना

Beed News: जेवणातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची मृत्यूशी झुंज सुरू, बीडमधील धक्कादायक घटना

बीडमध्ये जेवणातून विषबाधा; तीन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची प्रकृती चिंताजनक

बीडमध्ये जेवणातून विषबाधा; तीन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची प्रकृती चिंताजनक

बीडमध्ये जेवणानंतर तीन भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या चिमुकल्यांच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 26 फेब्रुवारी : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील (Ambajogai Taluka Beed) वागझरी गावात रात्रीच्या जेवणानंतर विषबाधा (Food poisoning) झाल्याने 3 चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. तर आईची मृत्यूशी झुंज सुरु आहे. साधना धारासुरे वय 6 वर्ष, श्रावणी धारासुरे वय 4 वर्ष आणि मुलगा नारायण वय 8 महिने असं विषबाधेने मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. तर भाग्यश्री धारासुरे (वय 28 वर्ष) असे त्यांच्या आईचे नाव आहे. भाग्यश्री यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Three children died due to food poisoning in Beed) नेमकं काय घडलं ? वागझरी येथील काशिनाथ धारासुरे यांनी आपल्या कुटुंबासह काल रात्री घरी जेवण केले होते. त्यानंतर सकाळी साधना, श्रावणी आणि आठ महिन्याच्या नारायण यांना त्रास होऊ लागला. त्यासोबत पत्नी भाग्यश्रीची देखील तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. वाचा :  गोळीबार प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच मिरवणूक, कारवाई करत पोलिसांनी दाखवला इंगा मृत्यूचं नेमकं कारण काय? मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून तिन्ही बालकांनी आणि कुटुंबीयांनी रात्री जे जेवण घेतले होते, त्याचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. वाचा :  जळगावात तमाशा कलावंत तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; भरबाजारात केला हृदयद्रावक शेवट शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण कळणार अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील रहिवासी काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील तीन बालकांसह पत्नी अशा चार सदस्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (26 फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आ. संजय दौंड यांनी स्वाराती रुग्णालयात भेट दिली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखं पसरलं आणि त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed , food , poison
  • First Published :
जाहिरात
जाहिरात