Home /News /maharashtra /

Nitesh Rane: शिवसैनिक हल्ला प्रकरणी नितेश राणेंना अटक की जामीन? कोर्टाचा उद्या निकाल

Nitesh Rane: शिवसैनिक हल्ला प्रकरणी नितेश राणेंना अटक की जामीन? कोर्टाचा उद्या निकाल

आमदार नितेश राणे यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली

    सिंधुदुर्ग, 28 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Cooperative Bank Election) रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत (Shiv Sena candidate Satish Sawant) यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणेंची (BJP MLA Nitesh Rane) तीनवेळा चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज प्रदीर्घ सुनावणी झाली असून यावर आज कोणताही निर्णय देण्यात आला नाही. उद्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सोमवारी अर्ज दाखल केला होता. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांनी बाजू मांडली. तर बचाव पक्षाच्या वतीने ऍड संग्राम देसाई यांनी युक्तीवाद केला. न्यायाधीश आणि वकील कागद पडताळणी केली. कोर्टाने सरकरी वकिलना विचारलं जामीन अर्जाबाबत समाधानी आहेत का? यावर सरकारी वकील यांनी नाही असे उत्तर दिले. जर नितेश राणे यांना पोलिसांनी दोन समन्स बजावले असताना व चौकशीला हजर असताना देखील त्यावेळी मोबाईल तपासणीची मागणी का केली नाही? तसंच पोलिसांनी या तपासात कमालीची गुप्तता बाळगली असताना एकाही आरोपीचे नाव जाहीर नसताना खासदार विनायक राऊत पत्रकार परिषद घेऊन फक्त नितेश राणे यांचेच नाव का घेतात. यावरून पोलीस दबावाखाली काम करत असून या तापसाबाबत संशय व्यक्त केला जातो असा युक्तिवाद नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी केला. या प्रक्रियेत आरोपींचे 8 मोबाईल हस्तगत करण्यासाठी  तसंच रेकॉर्ड pdr चेक करण्यासाठी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्याची सरकारी वकिलानी मागणी केली आहे. तसंच फिर्यादी संतोष परब यांचे वकिल प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तिवाद केला. 1.'ती अनोळखी माणसे होती तर त्यांनी संतोष परब यांच्या गाडीला का धडक दिली. ते धडक देऊन थांबले नाही तर त्यांनी येऊन त्यांच्या छातीवर चाकूने वार केले. हे मेडिकल रिपोर्ट मध्ये देखील सिद्ध झाल आहे. 2. संतोष परब यांना ज्या इनोव्हा कारने धडक दिली. त्यातील दोन जणांनी माझ्या समोर नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना कळवायला पाहीजे असं बोलां 3. पोलिसांनी ४ आरोप पकडले. त्यांच्याकडे शस्त्र देखील मिळाले त्याचा सहभाग देखील दिसून आला यामध्ये पोलिसांनी काय चुकीचा तपास केला ? 4. पोलिस आरोपींना २४ तास कस्टडीत ठेवत होते. त्यावर त्याच समाधान होत नव्हतं म्हणून ते पोलिस कस्टडी घेत होते. 5. जर ४ जणांना अटक केली त्यांना सहकार्य केल जात नव्हतं पोलिसांकडून तर त्यासंदर्भात का आवाज उठवला नाही.आता का बोलत आहात ? 6. आपल्या मागे प्रभावी माणसे आहेत म्हणून आरोपींनी गोट्या सावंत आणि नितेश राणे यांची नाव घेतली. कारण त्यांना माहीत होत की या दोन नावाची दहशत आहे. काय आहे प्रकरण? सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला जीवघेणा हल्ला नितेश राणे यांच्या कार्यकर्त्याने केला होता. त्या संदर्भात कणकवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारी वरून कणकवली पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर रहाण्याचे समन्स बजावलं होतं. त्यानंतर आता भाजप आमदार नीतेश राणे यांना कणकवली पोलिस स्टेशनमध्ये दोन वेळा हजेरी लावली लागली. त्यानंतर पुन्हा नितेश राणे यांनी कणकवली पोलिसांनी बोलवून घेतलं आणि चौकशी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेशी पंगा घेणं नितेश राणे यांना चांगलंच महागात पडल्याचही राजकीय वर्तुळात बोललं जातंय. नितेश राणे आहेत कुठे? गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे हे नॉट रिचेबल झाले. त्यामुळे नितेश राणे आहेत कुठे असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारला असता त्यांनी म्हटलं, कुठे आहेत हे सांगायला मला काय तुम्ही मुर्ख माणूस समजलात का? कुठे आहेत हे जरी मला माहिती असेल तरी मी सांगणार नाही. तुम्हाला का सांगावं? असा सवालही नारायण राणेंनी केला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Nitesh rane, Shiv sena, Sindhudurg

    पुढील बातम्या