मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'टोलनाके चालवणारे...', शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर घणाघात, साताऱ्यात पुन्हा दोन राजेंमध्ये संघर्ष

'टोलनाके चालवणारे...', शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर घणाघात, साताऱ्यात पुन्हा दोन राजेंमध्ये संघर्ष

शिवेंद्रराजे-उदयनराजेंमधला संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर

शिवेंद्रराजे-उदयनराजेंमधला संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर

साताऱ्यातला उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचातला संघर्ष सर्वश्रूत आहे. या दोघांमधला वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सचिन जाधव, प्रतिनिधी

सातारा, 27 मार्च : साताऱ्यातला उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचातला संघर्ष सर्वश्रूत आहे. या दोघांमधला वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. साताऱ्यातील गोडोली तळ्याच्या सुशोभिकरणावेळी खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. याला शिवेंद्रराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवेंद्रराजे या राजघराण्यात जन्माला आलेच कसे? असा प्रश्न उदयनराजेंनी केला होता. मात्र टोलनाके चालवणारेच आणि अन्यायकारक या घरात कसे जन्माला आले? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे, असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

काय म्हणाले होते उदयनराजे?

'शिवेंद्रराजेंनी वेगवेगळ्या संस्था स्थापन करून लोकांचे पैसे लुबाडले. त्यांनी अजिंक्यतारा, अजिंक्यतारा बाजार समिती, महिला बँका, बँका, कुक्कुटपालन द्वारे पैसे खाल्ले. मला हे सांगतानाही कमीपणा वाटतो, लाज वाटते. हे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे?,' अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली होती.

शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. शिवेंद्रराजेंच्या या आरोपाला उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एकदा समोरासमोर येऊन भ्रष्टाचार कुठे केला याचा पुरावा द्यावा. लोकांसमोर अथवा गांधी मैदानात मी येण्यास तयार आहे. माझा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर मी माझ्या मिशा आणि भुवया काढून टाकेन असं आव्हान खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना दिलं.

First published:
top videos

    Tags: Udayan raje bhosle