संभाजी भिडेंना आल्या पावली परत जावं लागलं, वढूला थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव

संभाजी भिडेंना आल्या पावली परत जावं लागलं, वढूला थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव

शिक्रापूर पोलीस समाधीस्थळी आले आणि भिडेंना समाधीस्थळी थांबण्यास मज्जाव करण्यात आला.

  • Share this:

शिरुर, 10 जानेवारी : शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे 7 वर्षानंतर वढू बुद्रुक इथं समाधीस्थळी दाखल झाले. मात्र काही वेळातच शिक्रापूर पोलीस समाधीस्थळी आले आणि भिडेंना समाधीस्थळी थांबण्यास मज्जाव करण्यात आला.

पोलिसांनी रोखल्यानंतर संभाजी भिडे त्या ठिकाणावरुन निघून शिरुर तालुक्यातील वाजेवाडी येथे एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला भेटले आणि पुण्याकडे रवाना झाले.

कोरेगाव भीमा व वढू बुद्रुक येथील दंगलीची जगभरात चर्चा झाली होती. या दंगलप्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप झाला. मात्र दंगलीपूर्वीपासून सहा वर्ष भिडे या परिसरात आले नसल्याचे सांगितले जात असून काल शनिवारी दि 9 ला रोजी अचानक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत संभाजी भिडे आले होते.

याबाबत शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस समाधीस्थळी दाखल होऊन भिडे यांना वढू बुद्रुकला थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा व वढू बुद्रुक येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची व घटनेची गोपणीय माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याने या परिसरात भिंडेना थांबण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.

Published by: Akshay Shitole
First published: January 10, 2021, 6:00 PM IST

ताज्या बातम्या