जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिर्डी विमानतळ बाँबने उडवून देण्याची धमकी

शिर्डी विमानतळ बाँबने उडवून देण्याची धमकी

शिर्डी विमानतळ बाँबने उडवून देण्याची धमकी

पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    हरीश दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी विमानतळ बाॅम्बने उडवून देण्याचे धमकीपत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 तारखेला शिर्डी विमानतळावर एक निनावी पत्र प्राप्त झाले आहे ज्यात शिर्डीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. विमानतळाचे व्यवस्थापक धिरेन भोसले यांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 506 नुसार गुन्हा दाखल केला असून आज राहाता पोलिसांनी शिर्डी विमानतळाच्या सुरक्षेचाही आढावा घेतला आहे. २६ नोव्हेंबर रोजी विमानतळाचे व्यवस्थापक हिरेन भोसले यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने निनावी पत्र पाठवले. विमातनतळावर बाॅम्ब लावले असून ते उडवून देऊ असं या धमकीपत्रात म्हटलं आहे अशी माहिती राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण परदेशी यांनी दिली. हे पत्र कुणी आणि का दिले याबद्दलचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी राज्य सरकारने शिर्डी जवळच्या काकडी गावात विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात या विमानतळाला सुरुवात झाली. ================

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात