जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वसईच्या भुईगाव समुद्र किनारी आढळली संशयास्पद बोट, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

वसईच्या भुईगाव समुद्र किनारी आढळली संशयास्पद बोट, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

वसईच्या भुईगाव समुद्र किनारी आढळली संशयास्पद बोट, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

वसईच्या भुईगाव समुद्र किनारी एक संशयास्पद बोट (Suspicious boat) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि तटरक्षक दलामार्फत बोटीची पाहणी करण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,02 सप्टेंबर : वसईच्या भुईगाव समुद्र किनारी एक संशयास्पद बोट (Suspicious boat) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि तटरक्षक दलामार्फत बोटीची पाहणी करण्यात येत आहे. दिवसभर ही बोट कुणाची आहे आणि का आली? याची माहिती मिळाली नसल्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आल्या आहेत. वसईजवळील भुईगाव समुद्रकिनार्‍यावर गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास एक संशयास्पद बोट स्थानिकांना दिसली. या भागात बोटींचा वावर नसल्याने ही अनोळखी बोट कशी आली? याचा स्थानिक मच्छिमारांना (Local fishermen) संशय आला. ही बोट समुद्र किनार्‍यापासून दोन नॉटीकल मैल आत आहे. बोटीवर कसलाच झेंडा किंवा निशाण नसल्याने संशयाला बळकटी मिळाली. याबाबत वसई पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी सुरू केली. हे वाचा -  बदली करा नाहीतर आत्मदहन; इशारा देऊन पोलीस हवालदार गायब झाल्यानं उडाली तारांबळ पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या मदतीने बोटीवरी तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोटीत कुणी आढळून आले नाही. त्यामुळे तटरक्षक दल आणि महाराष्ट्र सागरी किनारा मंडळाची (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) मदत घेण्यात आली आहे. ही बोट संशयास्पद असून आम्ही ड्रोनच्या मदतीने हवाई पाहणी केली. परंतु, अद्याप बोटीबद्दल माहिती मिळाली नसल्याचे परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले. हे वाचा -  खरं की काय? इथे सफाई कामगारांऐवजी चक्क माश्या ठेवतात टॉयलेट स्वच्छ; वाचून म्हणाल अफलातून आयडिया आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व यंत्रणांना सतर्क केले आहे. अंधार झाल्याने बोटीची पाहणी करण्याचे काम शुक्रवारी सकाळी केले जाईल, असे बंदर निरीक्षक बी. जी. राठोड यांनी सांगितले. दरम्यान, बोटीबाबत संदिग्धता असल्याने खबरदारी म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आले आहे. बोटीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात