सचिन जाधव, सातारा, 01 मे : बाजार समिती निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजेंच्या गटाने खासदार उदयनराजे यांच्या गटाला धूळ चारली. शिवेंद्रराजे यांच्या गटाने सर्व १८ जागा जिंकून खासदार उदयनराजे यांच्या गटाचा सुपडा साफ केला. शिवेंद्रराजे यांनी वर्चस्व राखल्याने खासदार उदयनराजेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, बाजार समितीतून उदयनराजेंना हद्दपार केल्यानतंर नगरपालिकेतूनही हद्दपार करू असा विश्वास आमदार शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी टीका करताना म्हटलं की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाची धुळधाण मतदारांनी केली. फक्त पदे भोगायची, लोकांची कामे करायची नाहीत. यामुळंच मतदारांनी त्यांना नाकारलं असून उदयनराजेंचा मार्केट कमीटीची जागा हडपण्याचा डाव आम्ही हाणुन पाडला. राज्यात नवीन वाळू धोरण लागू; 600 रुपयांत मिळणार एक ब्रास वाळू शिवेंद्रराजे म्हणाले तर येणाऱ्या नगरपालीकेच्या निवडणुकीत अशाच पद्धतीनं उदयनराजेंना हद्दपार करु. त्यांचा भ्रष्ठाचारी कारभार लोकांनी बघितलाय. उदयनराजेंची ताकत ही आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना कळाली असुन या निवडणुकीनंतर खासदारकीच्या संदर्भात भाजपाचे वरिष्ठच निर्णय घेतील असं सुद्धा शिवेंद्रराजे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.