मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : गवंड्याची मुलगी बनली सरकारी अधिकारी, पाहा प्रेरणा देणारा Video

Satara : गवंड्याची मुलगी बनली सरकारी अधिकारी, पाहा प्रेरणा देणारा Video

X
कोमल

कोमल सावंतने घरच्या परिस्थितीवरती मात करत केवळ जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर एमपीएसीमध्ये यश संपादन केलं आहे.

कोमल सावंतने घरच्या परिस्थितीवरती मात करत केवळ जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर एमपीएसीमध्ये यश संपादन केलं आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 29 नोव्हेंबर : गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे कोमलला लहानपणापासून अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. मूलभूत सेवा सुविधांसाठी झगडावे लागले. कोमलचे वडील गवंड्याचे काम करून कुटुंब चालवितात. हलाखीच्या परिस्थितीत घर तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलत आपल्या मुलीला अधिकारी बनवून त्यांनी इतिहास रचला आहे. 

सातारा  जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागातील मार्डी गावातील कोमल सावंतने घरच्या परिस्थितीवरती मात करत केवळ जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर एमपीएसीमध्ये यश संपादन केलं आहे. कोमलचे घवघवीत यश पाहून घरच्यांना अश्रू अनावर झाले. शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नाही. आई घरकाम तर वडील गवंडी काम करतात. अशा परिस्थितीतून कोमलनं मेहनतीनं विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा दिली. यात तिला चांगले यश मिळालं आहे. 

गावकऱ्यांना आनंद

दुष्काळी भागातील विद्यार्थी नोकरीला लागणं म्हणजे मोठा आनंदच असतो. कोमल एमपीएसीमध्ये उत्तीर्ण झाल्यावर गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली, ताशे, ढोल तूतारी निनादामध्ये कोमलची भव्य मिरवणूक काढली. गावची मुलगी अधिकारी बनल्याचं आनंद गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

‘त्या’ घटनेनं खेळाडू बनण्याचं स्वप्न भंगलं, पहिल्याच प्रयत्नात बनला अधिकारी

घरची प्रतिकूल परिस्थिती असताना आकुंश सावंत यांनी गवंडी काम करून मुलांना शिक्षण दिले. ही कौतुकास्पद बाब आहे. कोमलने आईवडिलांच्या घरकामास मदत करत शालेय शिक्षण घेतले. आपल्या वडिलांना आपली मुलगी कुठली अधिकारी झाली हे अजूनही माहिती नाही ते स्वतः बोलतात की, माझी मुलगी मोठी अधिकारी झाली.

Nashik : उद्योजक होण्यासाठी मिळणार मोफत प्रशिक्षण, 'या' पद्धतीनं घ्या लाभ

अंकुश मिस्त्रीची मुलगी अधिकारी बनली

कोमलचे प्राथमिक शिक्षण मार्डी जिल्हा परिषद शाळा, तसेच पुढे रयतेच्या दहिवडी कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.  2018 मधील महाराष्ट्र राज्यसेवा आयोग परीक्षेत अपयश आले. मात्र, खचून न जाता जिद्द, चिकाटीच्या जोरावर 2020 मध्ये राज्यकर निरीक्षकसाठी चौथा क्रमांकाने पास झाली. विक्रीकर निरीक्षक आधिकारीसाठी 2 क्रमांकाने यश संपादन केले. तिचा हा आनंद मार्डीकरानांही सुखावून गेला आहे. तिच्या या यशस्वी प्रयत्नामुळे अंकुशगवंडी मिस्त्रीची मुलगी अधिकारी बनली. असे शब्द ग्रामीण भागातील शेतकरी बोलून दाखवतात.

First published:

Tags: Local18, Satara