विकास भोसले, सातारा, : सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेले ढोल्या गणपतीचे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी… पुरातन मंदीर… सुंदर आणि रेखीव कळस… इतका सुंदर नजारा असेल आणि बाजूला गणपतीचं मंदीर… म्हणजे भारून टाकणारं वातावरण… हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये हे मंदीर उभारलं. एकाच दगडातून सलगपणे घडविलेली ही मूर्ती असून, पाहताक्षणी तिची भव्यता जाणवते. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिर येथे आहेत. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे संबोधले जाते. मंदिराचे आवार चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. न्यूज18 लोकमतशी बोलताना वाईच्या महागणपती ट्रस्टचे विश्वस्त विश्वास गोखले म्हणाले की, या महागणपतिची स्थापना वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्याने कदाचित त्याला महागणपती; ढोल्या गणपती असे नामाभिधान प्राप्त झाले असावे. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून, हा दगड कर्नाटकातून आणला आहे. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. हा गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती ३ मीटर ६३ सेमी इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल. वाईचा ईतिहास.. वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे. सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्याच्या खुणा आजही जागोजागी पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाईतल्या सिद्धेश्वर मंदिरात श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी आहे, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान आदी मंदिरे येथे आहेत. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती अथवा; ढोल्या गणपती असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले. मंदिराचे विधान चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहतं. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तु शास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अणकुचीदार टोके करून ती त्यात बसविली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईतील्या सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची २४ मीटर असल्याची माहिती वाई महागणपती ट्रस्ट विश्वस्त विश्वास गोखले यांनी दिली. वाईसह राज्यातल्या भाविकांची या गणपतीवर मोठी श्रद्धा आहे. तुम्ही वाईला गेला नसाल तर कृष्णाकाठच्या या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा. PHOTOS : गणरायाच्या परीक्षेत विठुमाऊली होणार का पास?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







