सातारा, 09 सप्टेंबर: साताऱ्यात (Satara Crime) दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला आहे. उदयनराजे (Udayan Raje) आणि शिवेंद्रराजेचे (Shivendra Raje) दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद सर्वश्रुत आहे. मात्र बुधवारी शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. हा घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. नेमका कशावरुन झाला वाद छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिस समोर गाडी लावली आणि त्यातून हा वाद सुरू झाला. धक्कादायक म्हणजे या दोन्ही गटांच्या झालेल्या हाणामारीत 6 जण गंभीर जखमी झाले आहे.
साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेचे दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर भिडले..
— News18Lokmat (@News18lokmat) September 9, 2021
भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक, सातारा शहर पोलीस. pic.twitter.com/bJa3b6oyyA
यावेळी कार्यकर्त्यांनी शस्त्रांचा वापर केला आहे. या हाणामारीत उदयनराजे समर्थक सनी भोसलेसह 6 जण या जखमी झाले आहेत. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.