मुंबई, 22 डिसेंबर : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी थंडीसाठी प्रतीक्षा करावी लागणार अशी शक्यता होती. पण, मागील दोन दिवसांमध्ये गारवा वाढला आहे. आगामी काही दिवसांमध्ये थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. कमाल आणि किमान तापमानात 11 अंशापर्यंत तफावत आहे. आज दिवसभर (22 डिसेंबर) देखील हवामानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात दिवसभर 20 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमान असेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. पुण्यात दिवसभरात 12.9 सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये 15..1, सातारा 14.3, कोल्हापूर 17 तर सोलापूरमध्ये 15.9 अंश सेल्सियस किमान तापमान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्र नाशिकमध्ये 13.2 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर अहमदनगरमध्ये किमान 15 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे. या आठवड्याच्या अखेरीस पुणे, नाशिक, जळगाव, नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान 12 अंश पर्यंत घसरेल असा हवामान विभागानं अंदाज व्यक्त केलाय.
IMD GFS मोडेल नुसार, या आठवड्याच्या अखेरीस 24/25 Dec ला नाशिक, पुणे, नंदुरबार जळगाव आदींसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमानात घट (10-12°) होण्याची शक्यता आहे. डहाणू मुंबई ठाण्यासह उ. कोकणातील काही भागात (16-18°) घसरेल. विदर्भातील उत्तरेकडील भागही (~12°)
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 21, 2022
एक छोटा स्पेल pic.twitter.com/cd5jbZeNIP
विदर्भ विदर्भातील नागपूरमध्ये 13.3 तर वर्ध्यात 14 अंश सेल्सियस किमान तापमानाचा अंदाज आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी 15.0 सेल्सियसच्या आसपास तापमान असेल, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीय. राज्यात पुढील 8 दिवस थंडीची लाट, मुंबईसह अन्य जिल्ह्यात इशारा, असा असेल अंदाज मराठवाडा मराठवाड्यातील परभणीमध्ये 13.6 तर उदगीरमध्ये 14.3 अंश सेल्सियस तापमान गुरुवारी दिवसभर असू शकते. औरंगाबादमध्ये दिवसभरातील तापमान 16 अंश सेल्सिसयस राहण्याचा अंदाज आहे. पुढील आठ दिवस राज्यात थंडीची लाट राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेती कामे करताना, रात्री अपरात्री शेतात जाताना, रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी जाताना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. या थंडीच्या तीव्र लाटेमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.