जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मिरज : सिव्हिलमध्ये रुग्णाला मृत घोषित केल्यानं भाऊ चिडला, डॉक्टरांवरच केला हल्ला

मिरज : सिव्हिलमध्ये रुग्णाला मृत घोषित केल्यानं भाऊ चिडला, डॉक्टरांवरच केला हल्ला

मिरज : सिव्हिलमध्ये रुग्णाला मृत घोषित केल्यानं भाऊ चिडला, डॉक्टरांवरच केला हल्ला

रागाच्या भरात डॉक्टरांच्या अंगावर धावून जात ‘तू पेशंटला पाहिले आहेस का’ असे विचारत रुग्णाच्या भावाने डॉक्टरांचा गळा दाबला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मिरज, 28 मार्च : मिरज सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केल्यानं रुग्णाच्या भावाने डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विनोद गोटे या रुग्णाचा भाऊ संदीप गोटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरज शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात अतिदक्षता विभागात रविवारी विनोद ज्ञानबा गोटे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विनोद यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात आणले होते. यावेळी रुग्णाला मृत घोषित करण्यात आल्याने विनोद गोटे यांचा भाऊ संदीप गोटे याचा राग अनावर झाला. जुन्नरमध्ये भीषण अपघातात 5 ठार, 2 चिमुकल्यांचा समावेश, 3 गंभीर जखमी रागाच्या भरात डॉक्टरांच्या अंगावर धावून जात ‘तू पेशंटला पाहिले आहेस का’ असे विचारत त्यांचा गळा दाबला. त्यानंतर संदीपने डॉक्टरांना मागे ढकलल्याने डॉ. विजय कदम यांच्या उजव्या हाताला लागून ते जखमी झाले. अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरला मारहाण केल्याबद्दल संदीप गोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गांधी चौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sangali
  • First Published :
जाहिरात
जाहिरात