Home /News /maharashtra /

चॅटिंगच्या संशयाचा आणखी एक बळी, निर्दयीपणे वार करत दिरानं संपवलं भावजयला; सांगली हादरलं

चॅटिंगच्या संशयाचा आणखी एक बळी, निर्दयीपणे वार करत दिरानं संपवलं भावजयला; सांगली हादरलं

दिरानं आपल्या भावजयचा (Brother in law)खून (Murder) केल्याची घटना घडली आहे.

    सांगली, 26 सप्टेंबर: सांगली (Sangli) पुन्हा एकदा हादरलं आहे. दिरानं आपल्या भावजयचा (Brother in law)खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. घराशेजारी असलेल्या तरुणासोबत मोबाईलवर चॅटिंग (Chatting on A Mobile Phone) केल्याच्या कारणानं दिरानंच आपल्या भावजयला संपवलं आहे. खून केल्यानंतर दिरानं भावजय घरात जिन्यावरुन पडल्याचा बनाव आरोपीनं केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं. पलूस तालुक्यातील बुर्ली येथे ही घटना घडली आहे. गुरुवारी झालेल्या या घटनेबाबत शनिवारी पोलिसांनी तपास करुन ही हत्या असल्याचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी कुणाल पवार (वय 28) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर मृत महिलेचं नाव सायली केतन पवार (वय 22) असं आहे. हेही वाचा- सुप्रिया सुळे सुखरुप, सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या गर्दीत घुसलं वाहन मृत सायली पवार या विवाहित तरुणी शेजारीच राहणाऱ्या तरुणाशी मोबाईलवरुन चॅटिंग केल्याचा तसंच त्याला भेटल्याचा संशय तिचा दिर कुणाल याला होता. गुरुवारी रात्री उशिरा सायली ही बेडरुममध्ये एकटी होती. एकटी असल्याचं बघून कुणाल तिच्या बेडरुममध्ये गेला आणि तिच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यानंतर तिच्या गळ्यावर आणि दोन्ही हातावरही त्यानं वार केले. यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती पलूस पोलिसांनी दिली. कुणालनं सायली ही घरात जिन्यावरुन पडल्याचा बनाव केला. त्यानंतर तिला मध्यरात्रीच्या सुमारास उपचारासाठी सांगलीतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला मृत घोषित करण्यात आलं. हेही वाचा- चिंताजनक बातमी!  पुन्हा एकदा भायखळा तुरुंगात कोरोनाचा हैदोस याच दरम्यान, गुरुवारी रात्रीच कुणाल पवारच्या घराशेजारी राहणारा श्रेयस पवार या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तपास केला असता सायली पवारचा मृत्यू हा अपघाती नसून खून असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी शनिवारी कुणाल पवारला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Murder news, Sangli (City/Town/Village)

    पुढील बातम्या