७ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन, सकल मराठा मोर्चाचे अल्टिमेटम

७ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन, सकल मराठा मोर्चाचे अल्टिमेटम

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली होती

  • Share this:

परळी, ०२ ऑगस्ट- सकल मराठा मोर्चाची सुरूवात परळीतून झाल्याने सरकारनेही परळीत येऊन चर्चा करावी असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. तसेच मराठा समाजाच्या सर्व मागण्यांवर ७ ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्यात यावा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा सकल मराठा मोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे. मराठा आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर आता बैठकांवर बैठका होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मतं जाणून घेतली. यात साहित्य, कला, उद्योग, कृषी, यासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. एकीकडे मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा लढायचा आणि दुसरीकडे मराठा समाजाच्या तरुणांसाठी नोकऱ्यांची संधी शोधायची असा कार्यक्रम सरकार आखणार आहे. तर दुसरीकडे परळीमध्ये सकल मराठा मोर्चाची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला ७ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यापुढे रस्त्यावर उतरून नाही तर ठिय्या आंदोलन करुन आपल्या मागण्या मान्य करुन घेऊ असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली होती. जवळपास 3 तास चाललेल्या या बैठकीला साहित्य, कला, उद्योग, कृषी, यासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. मंत्र्यांपैकी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देण्याचा पुनरूच्चार करीत, सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत अडीच तास चाललेल्या या बैठकीत, न्यायालयीन लढाईपासून ते नोकरी शोधण्याच्या मुद्यांपर्यंत उहापोह करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ शिंदे, ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, उद्योजक भैरवनाथ ठोमरे, शेतीपुरक उद्योजक डॉ. सतीश परब, आ.ह.साळुंखे, राम ताकवले, हणमंत गायकवाड, सादनंद मोरे, पांडुरंग बलकवडे, सुरेश हावरे, प्रकाश पोहरे, अभिजीत पवार, बी.बी.ठोंबरे, पोपटराव पवार, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुभाष तावडे, संभाजी निलंगेकर पाटील, सयाजी शिंदे, उल्हास घोसाळकर, जिजाब पवार, रघुजीराजे आंग्रे, एड. हर्षद निंबाळकर, एड शैलेष म्हस्के, तानाजीराव शिंदे, उपस्थिती होते.

हेही वाचा- 

कल्याणच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसेचा गोंधळ, बाहेरचे पदार्थ न्यायला बंदी घातल्यानं निषेध

VIDEO : नाश्कात मराठा आरक्षणासाठी बोंबाबोंब आंदोलन!

7 वर्षाच्या चिमुरड्याची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फेकला जंगलात

 

First published: August 2, 2018, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading