जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, 2 मराठी लेखकांचा होणार सन्मान

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, 2 मराठी लेखकांचा होणार सन्मान

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, 2 मराठी लेखकांचा होणार सन्मान

Sahitya Akademi Award : मराठीमध्ये नंदा खरे -कादंबरी उद्या आणि आबा महाजन- आबाची गोष्ट ( बालसाहित्य ) या दोन लेखकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च : देशभरात प्रतिष्ठेचे मानले जाणारे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर (Sahitya Akademi Award) झाले आहेत. यंदा दोन मराठी लेखकांना हे पुरस्कार पटकावण्यात यश आलं आहे. मराठीमध्ये नंदा खरे -कादंबरी उद्या आणि आबा महाजन- आबाची गोष्ट (बालसाहित्य) या दोन लेखकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नागपूरचे नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

News18

दरम्यान, देशभरात साहित्य अकादमीच्या पुरस्कारांना मोठं महत्त्व आहे. 20 भाषांसाठी आज वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 4 उपन्यास, 5 कथा संग्रह, 7 कविता संग्रह, 2 नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: prize
  • First Published :
जाहिरात
जाहिरात