Home /News /maharashtra /

EXCLUSIVE: सचिन वाझे यांचा NIA चौकशीत गौप्यस्फोट, अनिल देशमुखांसह आणखी एका हाय प्रोफाइल मंत्र्यांचं घेतलं नाव!

EXCLUSIVE: सचिन वाझे यांचा NIA चौकशीत गौप्यस्फोट, अनिल देशमुखांसह आणखी एका हाय प्रोफाइल मंत्र्यांचं घेतलं नाव!

Sachin Vaze Statement to NIA: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते.

मुंबई, 23 मार्च : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याने NIA चौकशीत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून मला पैसे वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असं सचिन वाझे याने मान्य केलं आहे. सचिन वाझेच्या या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे याने या चौकशीत आणखी एका मंत्र्याचं नाव घेतलं आहे आणि त्यांनी आपल्याला मागील वर्षी पैसे वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा दावा केला आहे. त्यामुळे सचिन वाझे याच्या दाव्यानुसार, पैसे वसुलीचं टार्गेट देणारा दुसरा नेता कोण, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ठाकरे सरकारमधील तो दुसरा मंत्री कोण? मनसुख हिरेन प्रकरण...नंतर सचिन वाझे याला झालेली अटक आणि IPS परमवीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर टाकलेला लेटरबॉम्ब, या सगळ्या प्रकरणामुळे महाविकास आघाडीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. गृहमंत्र्यांचा बचाव करण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले. मात्र आता सचिन वाझे याने पैसे वसुलीचं टार्गेट मिळाल्याचं मान्य केल्यानं सत्ताधाऱ्यांची अडचण झाली आहे. मात्र त्याहून धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरापूर्वीही ठाकरे सरकारमधील दुसऱ्या एका वजनदार मंत्र्याने आपल्याला पैसे वसुली करण्यास सांगितल्याचं वाझे याचं म्हणणं आहे. सचिन वाझेच्या पुढील चौकशीत या मंत्र्याचं नावही अधिक स्पष्टपणे समोर येईल. त्यामुळे सत्तेत सामील असणाऱ्या तीन पक्षांपैकी कोणत्या पक्षातील मंत्री यात सहभागी आहे, हे पुढील काळातच स्पष्ट होईल. मात्र या सगळ्या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार, एवढं मात्र नक्की. परमवीर सिंह यांनी केला होता आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. याच पत्रात परमवीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर पोलीस अधिकाऱ्यांना पैसे वसुली करण्याचं टार्गेट देण्याचा आरोप केला होता. मात्र तेव्हा अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु आता सचिन वाझे यानेच आपल्याला पैसे वसुलीचं टार्गेट मिळाल्याचं मान्य केल्याने अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.
First published:

पुढील बातम्या