जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणणं पडणार महागात

बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणणं पडणार महागात

बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणणं पडणार महागात

बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधींना आता आपलं मराठी प्रेम दाखवणे अंगलट येणार आहे. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी तसा इशारा देखील दिलाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    संदीप राजगोळकर,22 मे : बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधींना आता आपलं मराठी प्रेम, महाराष्ट्र प्रेम दाखवणे अंगलट येणार आहे. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी तसा इशारा देखील दिलाय. कर्नाटक सरकार आगामी अधिवेशनात कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात जय महाराष्ट्र म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्य विरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद सदस्यत्व रद्द करणार असा नवीन कायदा अमलात आणणार आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी ही माहिती पत्रकारांना दिलीय. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचं देखील रोशन बेग यांनी स्पष्ट केलं आहे. एकीकडे अल्पसंख्यांक घटनात्मक अधिकार देण्यास टाळाटाळ सुरू असताना एकीकरण समितीच्या लोक प्रतिनिधींची गळचेपी होणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात