POSITIVE NEWS : महाराष्ट्रातील या 55 वर्षीय व्यक्तीचा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हालाही कोरोनाविरोधातील लढाईत बळ मिळेल!

POSITIVE NEWS : महाराष्ट्रातील या 55 वर्षीय व्यक्तीचा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हालाही कोरोनाविरोधातील लढाईत बळ मिळेल!

रोहा शहरातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाविरोधातील सकारात्मक लढा समोर आला आहे.

  • Share this:

रायगड, 28 जुलै : कोरोना रुग्णांचे जगभरातील धडकी भरवणाऱ्या आकड्यांमुळे आणि त्याच्या लक्षणांमुळे अनेकजण कोरोनाची लागण होताच खचून जातात. तसंच आरोग्य व्यवस्थेतील तक्रारींमुळेही नागरिक नकारात्मक सूर आवळत आहेत. मात्र अशा स्थितीच रोहा शहरातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाविरोधातील सकारात्मक लढा समोर आला आहे.

सदाराम गणपत शिंदे, वय 55 वर्षे, राहणार पाले बुद्रुक रोहा. ते रुग्णालयात दाखल व्हायच्या 8 दिवस आधीच मुंबईहून गावाला राहायला आले होते. ताप येत असल्याने गावातील डॉक्टरांनी त्यांना तात्पुरत्या तापाच्या गोळ्या देऊन लागलीच स्वॅब टेस्ट करायला सांगितले. दोन दिवसांनी शिंदे यांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु पुढे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून रोह्याच्या शासकीय रुग्णालयात गेले असता त्यांना तात्काळ अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 108 नंबर अँबुलन्स सुविधेच्या माध्यमातून त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मनात भीती होती की, अलिबागला कोणीही ओळखीचे नाहीत आणि नातेवाईकसुद्धा सोबत नाहीत. 26 मे रोजी पहाटे 2 वाजता त्यांना अतिदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले.

सदाराम शिंदे हे आधीपासूनच ब्लडप्रेशर आणि मधुमेहाचे रुग्ण होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे. शिंदे यांना तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आला.

या परिस्थितीतही श्री.सदाराम शिंदे जिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वजण या रुग्णालयात दाखल झालेल्यांसोबत कसे वागतात, त्यांना कशी सेवा देतात, याचे निरीक्षण करीत होते, अनुभवत होते. 55 वर्षीय करोनाबाधित रुग्ण म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या शिंदे यांनी बरे झाल्यानंतर “ हे सर्व करताना जिल्हा रुग्णालयातील सिस्टर्स येथील रुग्णांशी एवढ्या आत्मीयतेने वागत होत्या की, त्यामुळे माझी भीती पूर्ण निघून गेली. इथे सर्व सिस्टर आमच्याशी एवढ्या नॉर्मल वागत होत्या की, आम्हाला करोना झाला आहे, याची बिलकुल जाणीव होवू देत नव्हत्या. आमची अत्यंत मायेने विचारपूस करून आमचे मानसिक दडपण कमी करत होत्या. सर्व डॉक्टर्ससुद्धा खूप प्रेमाने आमची चौकशी करीत. सफाई कामगारसुद्धा वेळोवेळी साफसफाई करून वॉर्ड अतिशय स्वच्छ व सुंदर ठेवत होते. कोरोनाच्या संकटातून मुक्त होवून पूर्ण बरा झाल्यावर मी जिल्हा रुग्णालयातून 2 जून 2020 रोजी सुखरुपपणे घरी परतलो.

पुढे लगेचच म्हणजे 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ आल्याकारणाने मला माझा अनुभव लिहिता आला नाही. परंतु अलिबाग जिल्हा रुग्णालयातील अनुजा, दक्षता, तृप्ती, उत्कर्षा, प्रज्ञा आणि सृष्टी या सर्व सिस्टर्स, डॉक्टर्स आणि सफाई कर्मचारी या सर्वांनी जी आमची सेवा केली, त्याची पोचपावती देणे गरजेचे असल्याने उशिराने का होईना, हा अनुभव लिहिला आहे.” या शब्दात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: July 27, 2020, 10:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading