जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात पेटला वणवा, जळगाव अजूनही टॉपवरच..., तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

महाराष्ट्रात पेटला वणवा, जळगाव अजूनही टॉपवरच..., तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

फाईल फोटो

फाईल फोटो

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी तापमानाचा 40 अंशांचा आकडा पार केला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 मे : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्यात तापमानाची नोंद वाढत असताना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाना दिला होता. त्यानुसार, राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच आता हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत काल 14 तारखेला राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या तापमानाची आकडेवारी जाहीर केली. राज्यात 14 मेला झालेल्या उच्चांकी तापमानाची नोंद (जिल्ह्यानुसार) - परभणी 43.0°C - सोलापूर 41.1 - बीड 42.7 - जळगाव 43.2 - छत्रपती संभाजीनगर 41 - नांदेड 42.6 - उदगीर 39.8 - जालना 42.5 - मालेगाव 43.2 - धाराशीव 40.2 उन्हाळ्यात अशी घ्या काळजी -  उन्हाळ्यात होणारे आजार व उष्माघातचा त्रास आपण टाळू शकतो. मात्र त्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागते, त्यावेळी शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे. विशेषतः दुपारी ११ ते ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बाहेर पडू नये. कुठेही बाहेर जाताना कायम सोबत गोड पदार्थ किंवा चॉकलेट ठेवावे. जेणेकरून ग्लानी आली असता इलेक्ट्रोल पाणी प्यायल्याने त्वरीत आराम मिळतो. तसेच डोळ्यांवर गॉगल्स आणि डोक्यावर टोपी वापरावी. आहार गहू, जुने तांदूळ, मूग या धान्यांचा आहारात समावेश करावा. नवीन धान्य कफ वाढवतात तसेच पचनशक्ती कमी करतात म्हणून त्यांचा रोजच्या आहारात समावेश करू नये. नाईलाजाने नवीन धान्य खावे लागल्यास ते धान्य आधी भाजून घ्यावे. जेणेकरून ते पचनास हलकी होतात.

पेय

1.डाळिंबाचे सरबत हे पित्तशामक असते. लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचे सेवन करावे. 2.नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. 3.कोकम सरबताचे सेवन करावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच पिऊ शकता. 4.फ्रिजमधील पाणी न पिता घरात माठ असेल तर त्यातील पाणी सेवन करावे. तसंच उन्हातून आल्या आल्या अजिबात पाणी पिऊ नये. 5.पाण्याबरोबर गुळाचे सेवन करणे योग्य ठरते. म्हणजे उष्माघाताचा त्रास होत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात