जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धर्म कधी भारताची ओळख होऊ शकत नाही,संघाच्या मंचावर प्रणवदांची देशभक्ती

धर्म कधी भारताची ओळख होऊ शकत नाही,संघाच्या मंचावर प्रणवदांची देशभक्ती

धर्म कधी भारताची ओळख होऊ शकत नाही,संघाच्या मंचावर प्रणवदांची देशभक्ती

नागपूर, 07 जून : नागपूर, 07 जून : भारताची आत्मा सहिष्णुतेतच आहे, वेगळा रंग, भाषा, वेगळी ओळख आहे, हिंदू मुस्लिम, शिख, इसाईमुळे भारत एक आहे. त्यामुळे एका वर्ग आणि धर्मामुळे भारताची वेगळी ओळख निर्माण होऊ शकत नाही असं माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या मंचावर स्पष्ट केलं. त्यांनी आपल्या भाषणाचा संघाचा उल्लेख टाळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नागपूर, 07 जून : नागपूर, 07 जून : भारताची आत्मा सहिष्णुतेतच आहे, वेगळा रंग, भाषा, वेगळी ओळख आहे, हिंदू मुस्लिम, शिख, इसाईमुळे भारत एक आहे. त्यामुळे एका वर्ग आणि धर्मामुळे भारताची वेगळी ओळख निर्माण होऊ शकत नाही असं माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या मंचावर स्पष्ट केलं. त्यांनी आपल्या भाषणाचा संघाचा उल्लेख टाळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. संघप्रथेप्रमाणे प्रमुख अतिथीचं भाषण आधी होत असते पण यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणवदांच्या आधी भाषण केलं. प्रणवदांनी आपल्या भाषणात भारताची व्याख्याच स्पष्ट करून सांगितली. भाषणाच्या सुरुवातीलाच  मी राष्ट्रवाद, देशहित आणि भारताचेच संदर्भात बोलणार असं प्रणव मुखर्जींनी स्पष्ट केलं. 600 वर्षांची मोगलांची सत्ता एका ब्रिटिश कंपनीने संपवली, अनेक राजवटी आल्या पण भारताची ओळख कायम राहिली. जसं गांधींनी भारतीय राष्ट्रवाद शिकवला त्याच आक्रमकता आणि विनाशकारी नव्हता असंही त्यांनी म्हटलंय. भारताची आत्मा सहिष्णुतेतच आहे. वेगळा रंग, भाषा, वेगळी ओळख आहे, हिंदू मुस्लिम, शिख, इसाईमुळे भारत एक आहे त्यामुळे कोणत्याही एका वर्गाचं वर्चस्व ही सगळ्या समाजाची ओळख असू शकत नाही असं प्रणवदांनी स्पष्टपणे सांगितलं. आपला राष्ट्रवाद हा वसुधैव कुंटुंबकम् आणि ‘सर्वे भवन्तु सुखिन:..’ विचारावर आधारीत आहे. आपल्या राष्ट्रवादाच वेगवेगळे विचार आहे. पण घृणा आणि असहिष्णुतेमुळे आपला राष्ट्रवाद कमकुवत होत आहे अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. तर मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी यांना बोलवण्यात आल्यामुळे झालेल्या वादाचा समाचार घेतला. दरवर्षी आम्ही दिग्गज व्यक्तीला आमंत्रित करत असतो. त्यावर वाद घालणे हे निरर्थक आहे. आज मुखर्जी आमच्या कार्यक्रमाला आले याचा अर्थ ते बदलणार असा नाही. ते जे आहे तेच राहणार आहे आणि संघ संघाच्या जागी कायम राहणार आहे असं भागवतांनी स्पष्ट केलं. संघ हा फक्त हिंदूसाठी नाहीतर समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. संघाच्या कामाला प्रत्यक्ष बघा, ते खरं आहे का नाही ते येऊन पहा…चांगलं वाटलं तर आपलं स्वागतच आहे. नाही पटलं तर जाण्याची सगळ्यांना मोकळीक आहे असंही भागवतांनी नमूद केलं. या  कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अर्धेंदु बोस, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे पुत्र सुनील शास्त्री, अरविंद मिल्सचे संजय लालभाई, मफतलाल इंडस्ट्रीजचे विशाल मफतलाल, ‘सीसीएल प्रोडक्ट्स’ छल्ला राजेंद्र प्रसाद, माजी भारतीय फुटबॉलपटू कल्याण चौबे, सुप्रसिद्ध लेखक आणि ‘इन्फिनिटी फाऊंडेशन’चे संस्थापक राजीव मल्होत्रा उपस्थित होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात