मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! ऑपरेशन करताना रुग्णाच्या पोटात राहिले गॉज पॅड; आता थेट आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल

धक्कादायक! ऑपरेशन करताना रुग्णाच्या पोटात राहिले गॉज पॅड; आता थेट आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिपळूण शहरातील एसएमएस हॉस्पिटलची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिपळूण शहरातील एसएमएस हॉस्पिटलची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिपळूण शहरातील एसएमएस हॉस्पिटलची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत.

रत्नागिरी, 8 जानेवारी : शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या पोटात गॉज पॅड राहिल्याने झालेला मानसिक त्रास आणि उपचारासाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च, या प्रकरणात पेढांबे येथील संजय मधुकर शिंदे यांचा तक्रार अर्ज बुधवारी मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या जनता दरबारात दाखल झाला आणि खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिपळूण शहरातील एसएमएस हॉस्पिटलची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत.

शिंदे यांनी जनता दरबारात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की 10 जून रोजी घरगुती भांडण सोडताना माझ्या पोटावर चाकूचा वार झाला. त्यामध्ये मी गंभीर जखमी झालो. नातेवाइकांनी शहरातील एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ऑपरेशन झाले आणि 20 दिवसांनी घरी सोडण्यात आले, मात्र ऑपरेशनच्या ठिकाणी पिवळा फोड आला व त्यातून पू बाहेर येऊ लागला. पुन्हा एसएमएसस हॉस्पिटलमध्ये गेलो. दोन-तीन महिने ड्रेसिंग सुरू होते, मात्र पू येणे थांबत नव्हते, मग प्रकृती बिघडली आणि चिपळूण शहरातील डॉ. पाटणकर यांच्याकडे 14 सप्टेंबर रोजी माझी सोनोग्राफी झाली. त्यामध्ये ज्या ठिकाणी जखम झाली होती, त्यामध्ये गॉज पॅड आढळून आला. त्यामुळे 15 ठिकाणी पू झाला होता. पुन्हा 15 सप्टेंबरला सोनोग्राफी करून खात्री करण्यात आली. या साऱ्या प्रकारामुळे माझे कुटुंब हादरले, अशा शब्दांमध्ये रुग्णाने त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेची माहिती दिली आहे.

'चिपळूणचे आमदार शेखर निकम तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांना याची माहिती आम्ही दिली. एसएमएसस हॉस्पिटलच्या डॉ. परमेश्वर गौड यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी मी खर्च देईन, पुढे उपचार करा, असे सांगितले. डॉ. पाटणकर यांनी 23 सप्टेंबर 2020 ला ऑपरेशन करून गॉज पॅड काढले, मात्र त्यावेळी आतड्याला होल असल्याचे लक्षात आल्यावर अन्य ठिकाणी जाऊन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी सात लाख रुपये खर्च आला. गरीब कुटुंबातील मी असल्यामुळे कर्जबाजारी झालो. ज्या डॉक्टरांमुळे माझे नुकसान झाले, मानसिक त्रास झाला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा 26 जानेवारीपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार आहे,' असा इशारा संजय शिंदे यांनी दिला आहे.

First published:

Tags: Rajesh tope, Ratnagiri, Ratnagiri police