मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गुहागरमध्ये किनारपट्टीवर तेलाचा तवंग, समुद्राच्या पाण्याचा रंग बदलल्यानं परिसरात खळबळ

गुहागरमध्ये किनारपट्टीवर तेलाचा तवंग, समुद्राच्या पाण्याचा रंग बदलल्यानं परिसरात खळबळ

गुहागर समुद्र किनारपट्टीवर पाण्यामध्ये तेलाचा तवंग (oil layer) दिसत आहे. समुद्राच्या पाण्याचा रंग बदलला आहे. गुहागरपासून वरचा पाटपर्यंतच्या 7 किलोमीटरच्या परिसरात समुद्रात तेलाचा तवंग आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी, 14 जून : गुहागर समुद्र किनारपट्टीवर पाण्यामध्ये तेलाचा तवंग (oil layer) दिसत आहे. समुद्राच्या पाण्याचा रंग बदलला आहे. गुहागरपासून वरचा पाटपर्यंतच्या 7 किलोमीटरच्या परिसरात समुद्रात तेलाचा तवंग आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मासेमारी बंद असतानाही असा तेलाचा तवंग (guhagar beach affected with oil Layer) आला कुठून याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

पाण्याला तेलाचा उग्र वास येत असल्याची स्थानिक राहिवाशांनी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून ठराविक भागात असा तवंग दिसून येत आहे. हा तवंग किनाऱ्यावरील वाळूला चिकटत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. नेमका हा तवंग कशामुळे येत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लाटांबरोबर वाहत येणाऱ्या या तवंगाचे प्रमाण वाढले तर, समुद्रातील माशांवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम छोट्या प्रमाणात किनाऱ्यावरून करणाऱ्या मच्छीमारी व्यवसायावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे वाचा - Corona Update : कोल्हापूर-रत्नागिरी वगळता बहुतांश ठिकाणी दिलासाच, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

सध्या पावसामुळं वारे वेगानं वाहत असून त्यानं समुद्र खवळलेला असतो. त्यामुळं तेलाचा तवंग संपूर्ण किनाऱ्यावर पसरून सर्व किनारपट्टी दूषित होण्याची शक्यता आहे. तेलकटपणा किनाऱ्यावर पसरल्यानं पर्यटकांना किंवा तेथून जाणाऱ्या लोकांना त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. पावसाळ्यात काही मच्छीमार येणाऱ्या मोठ्या लाटांमध्ये लहान मोठे मासे पकडण्यासाठी जातात. किनारपट्टीवर हातानं जाळी टाकून मच्छी पकडणाऱ्याच्या जाळ्याचेसुद्धा त्यामुळं नुकसान होऊ शकतं.

First published:
top videos

    Tags: Ratnagiri