मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ratnagiri Flood: चिपळूणच्या कोविड रुग्णालयात 8 रुग्णांचा मृत्यू

Ratnagiri Flood: चिपळूणच्या कोविड रुग्णालयात 8 रुग्णांचा मृत्यू

Covid patients died in Chiplun Hospital: चिपळूणमधील कोविड रुग्णालयात तब्बल आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Covid patients died in Chiplun Hospital: चिपळूणमधील कोविड रुग्णालयात तब्बल आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Covid patients died in Chiplun Hospital: चिपळूणमधील कोविड रुग्णालयात तब्बल आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चिपळूण, 23 जुलै : रत्नागिरीत आलेल्या महापुराचा (Flood in Ratnagiri) फटका कोविड रुग्णालयाला (Covid Hospital) बसला असून तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू (relatives alleges patient died due to lack of oxygen) झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कोविड रुग्णालयाला चहूबाजुंनी पाण्याने वेढल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चिपळूणच्या अपरांत कोविड सेंटरलाही चहूबाजुंनी पाण्याने वेढलं आहे. याच कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

BIG BREAKING: महाडमध्ये मोठी दुर्घटना; तळई गावात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू

" isDesktop="true" id="583279" >

मिळालेल्या माहितीनुसार अद्यापही या रुग्णालयाच्या चारही बाजुंना पाण्याने वेढले आहे. त्यामुळे रुग्णवाहिका सुद्धा कोविड रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तर रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रायगड आणि रत्नागिरी परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेकडो नागरिक अडकून पडले आहेत. पावसाने आता विश्रांती घेतली असल्यामुळे पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी 3 ते 5 फूट पाणी कायम असल्याचं पहायला मिळत आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी घटनास्थळावर एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच नेव्हीचे पथक दाखल झाले असून बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू झाले आहे.

First published:
top videos

    Tags: Ratnagiri