• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • वडिलांचं एक वाक्य जिव्हारी लागलं, 15 वर्षीय मुलीने थेट आत्महत्या केली!

वडिलांचं एक वाक्य जिव्हारी लागलं, 15 वर्षीय मुलीने थेट आत्महत्या केली!

एका घटनेमुळे 15 वर्षीय मुलीने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:
रत्नागिरी, 30 जुलै : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शाळांना कुलूप लागलं आहे. यावर पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. मात्र हेच शिक्षण घेत असताना घडलेल्या एका घटनेमुळे 15 वर्षीय मुलीने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलीला वडील ओरडले. याच रागातून सोमेश्वर मुस्लीम मोहल्ला येथील 15 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाल्यानंतर मोहल्ल्यात खळबळ उडाली. आत्महत्येची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सोमेश्वर मुस्लीम मोहल्ला येथील मारिया आजिम दाऊद ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती. ऑनलाईन अभ्यासक्रम शिकण्यासाठी ती घरातील मोबाईल वापरत होती. केवळ ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल वापरायचा, अशी सक्त ताकीद तिच्या वडीलांनी दिली होती. तरीही मंगळवारी मारिया मोबाईलवर गेम खेळताना वडीलांना दिसली. यापुढे मोबाईलवर गेम खेळू नको असे सांगत त्यांनी तिला दम भरला होता. हेही वाचा - हृदयद्रावक घटना! कुलरचा शॉक लागून तीन बहिणींनी जागेवरच सोडला जीव वडील ओरडल्याच्या रागातून मारियाने रात्रीच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी घरातील नातेवाईक उठल्यानंतर मारियाचा शोध घेण्यात आला. यावेळी एका खोलीत गळफास लावल्याच्या स्थितीत आढळून आली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली. मोबाईल गेमसारख्या क्षुल्लक कारणावरून विद्यार्थिनीने हा टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published: