मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बलात्कार पीडितेला शाळेतून काढल्याचा आरोप

बलात्कार पीडितेला शाळेतून काढल्याचा आरोप

ही पीडित मुलगी नववीत शिकते आहे. चार महिन्यांपूर्वी उमाकांत आडे नावाच्या मिल्ट्रीत नोकरीला असलेल्या तरुणानं नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी जवळीक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व लग्नाचे आमिष दाखवले होते.

  लातूर, 27 नोव्हेंबर: बलात्कार पीडित मुलीला बदनामी होण्याच्या भीतीनं शाळा व्यवस्थापनानं शाळेतून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात ही घटना घडली आहे.

  ही पीडित मुलगी नववीत शिकते आहे. चार महिन्यांपूर्वी उमाकांत आडे नावाच्या मिल्ट्रीत नोकरीला असलेल्या तरुणानं नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी जवळीक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व लग्नाचे आमिष दाखवले होते.

  या प्रकारानंतर मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली, मात्र गुन्हा नोंद करून घेण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी मुलीच्या आईकडं पैश्यांची आणि शारीरिक सुखाची मागणी केली असल्याचा आरोप देखील मुलीच्या आईनं केलाय.

  याप्रकरणी मुलीच्या घरच्यांच्या तक्रारीवरून देवणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ही बाब मुलीच्या शाळेत माहिती झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनानं शाळेतून काढल्याचा आरोप पीडित मुलीनं केलाय.

  शाळेनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं म्हणून दाखला दिल्याचा दावा शाळेनं केलाय.

  First published:

  Tags: Rape, Victim, महाराष्ट्र, शाळा