मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रामदेव बाबांच्या 'त्या' विधानावरुन महाराष्ट्रात घमासान

रामदेव बाबांच्या 'त्या' विधानावरुन महाराष्ट्रात घमासान

महाराष्ट्रात नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. या वादात आता योगगुरू बाबा रामदेव यांनी उडी घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

ठाणे, 25 नोव्हेंबर : महाराष्ट्रात नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. या वादात आता योगगुरू बाबा रामदेव यांनी उडी घेतली आहे. रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं बाबा रामदेव म्हणाले.

ठाण्यातील हायलँड भागात पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने आज (दि.25) शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही उपस्थित होत्या. अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं.

रामदेव बाबांच्या या विधानानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई चांगल्याच संतापल्या आहेत. रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. तसंच तुमच्या कार्यक्रमात येऊन जाब विचारण्याचा इशाराही तृप्ती देसाई यांनी रामदेव बाबांना दिला आहे.

रामदेव बाबा यांना राज्य सरकारने महाराष्ट्र मध्ये येण्यास बंदी घालावी, आणि यापुढे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी आरपीआय खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात महिलासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली यामुळे राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीदेखील आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांची प्रकरणे ताजी असतानाच रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

First published:

Tags: Baba ramdev