नाना असं काही करेल हे मान्य नाही - राज ठाकरे

नाना असं काही करेल हे मान्य नाही - राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज अमरावतीपासून त्यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, अमरावती, 17 आॅक्टोबर : नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली. तसंच पुरुषी अत्याचाराचा उल्लेख महिलांनी नक्की करावा पण हा आरोप तेव्हाच करायचा दहा वर्षांनी नाही असंही राज ठाकरे म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज अमरावतीपासून त्यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली. अमरावतीत राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत पार पडलीय या मुलाखतीत त्यांनी चौफेर तोफ डागली.

ट्विटरवरून मीटू मोहिमेमुळे अनेकांवर आरोप होत आहे. महिला आपल्यावरील अत्याचाराबद्दल बोलत आहे पण यात कुणाची चेष्टा केली, ती होता कामा नये. नाना पाटेकर उद्दट वागतो हे मान्य आहे. पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांची पाठराखण केली.

तसंच सिने इंडस्ट्रीमध्ये असं काही घडत असेल तर तेव्हा लता मंगेशकर, आशा भोसले यांना त्रास झाला नसेल का ?, १५ वर्षांची असतांना मी इंडस्ट्रीट मी आले तेव्हा एका कवीने त्यांना त्रास दिला डायरेक्टरने त्याला तेव्हाच काढले असे लता मंगेशकर यांनी माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

तसंच पुरुषी अत्याचाराचा उल्लेख महिलांनी करायलाच हवा, पण तेव्हाच करायचा दहा वर्षानी नाही असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

मी काही १ लाख ४५ हजार विहिरी शोधणार नाही कारण राज्यात १ लाख ४५ हजार विहिरी बांधण्याची शक्यताच नाही. राज्यातील ४४ टक्के जमीन ही दुष्काळाच्या दिशेने जात असल्याचं नॅशनल जिओग्राफिकचा रिपोर्ट आहे असंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगत फडणवीस सरकारवर टीका केली.

माझे वडील संगितकार असल्याने त्यांनी माझे नाव स्वरराज ठेवले होते. माझे नाव स्वरराजवरून राज असं पहिल्या मार्मिकमधील व्यंगचित्रासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केले त्यामुळे माझे दुसऱ्यांदा बारसे झाले असा किस्साही राज ठाकरे यांनी सांगितला.

मी जेव्हा गुजरातमध्ये गेलो तेव्हा विकासाचं मॉडेल फसवं असं नव्हतं. रतन टाटा यांनी सांगितल्यामुळे मी गुजरातमध्ये गेलो होतो. गुजरात दौऱ्यात अनेक एसपी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी माहिती द्यायची त्यावरून माझा गुजरात विकास हा मनावर बिंबवलं गेलंय. पण आता मुख्यमंत्री असलेला माणूस पंतप्रधान झाल्यावर एवढा कसा बदलू शकतो ? मुळात नरेंद्र मोदी हा विकास पुरुष नसून भकास पुरुष आहे अशी टीकाही राज ठाकरे यांनी मोदींवर केली.

राज्यात जेव्हा निवडणुका सुरू होतात तेव्हा सांगतात की काका पुतण्याला धडा शिकवणार नंतर म्हणतात की त्यांचे बोट धरून राजकारणात आलो मग आता त्यांनी केले की प्रेम आम्ही केले की लफड असा टोलाही राज यांनी लगावला.

डिझेल-पेट्रोलचे भाव, रुपयाचे अवमूल्यन, बेरोजगारी विषयावरून लक्ष हटविण्यासाठी सरकारने तर मी टू आणले तर नाही ना ? अशी शंकाही राज ठाकरे यांनी उपस्थितीत करतया गोष्टी हास्यास्पद करू नये असा टोला लगावला.

३१ आॅक्टोबरला वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण आहे. वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काय बोलले हे पुराव्यासह मुंबईत जाहीर करेन असंही यावेळी राज ठाकरेंनी जाहीर केलं.

मी जी मराठी माणसांची बाजू मांडतो ती खरी आहे. एक आंदोलन सांगा जे अर्धवट सोडले. त्या वेळेची शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वातील शिवसेना आजची मनसे आहे. आता पैशाची गोष्ट असली की धमक्या मागे पडतात. उद्या दसऱ्यालाही राजीनाम्याची शिवसेनेकडून घोषणा येतील पण होणार काहीच नाही असा टोलाही राज यांनी सेनेला लगावला.

==================================================================

First published: October 17, 2018, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading