रत्नागिरी, 7 ऑक्टोबर : राज्यात अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाची अपेक्षा शेतकरी वर्गाला होती. त्यामुळे या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर यातच काही ठिकाणी पावसामुळे नद्या नाल्यांना पूरही आले आहेत. कोट्यावधींचा फटका - तर चिनी समुद्रात नोरु चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गेले दोन दिवस समुद्रातील वातावरण बदल झाल्यामुळे त्याचा मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. खराब हवामान व पावसामुळे मासेमारी बोटीने किनारा गाठला आहे. त्यामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. तर समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरासह कोकणातील पारंपारिक मासेमारी बंदरात बोटी नांगर टाकून उभ्या आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. हेही वाचा - 12वीनंतर पुढे बिझनेस करण्याची इच्छा आहे? मग ‘या’ क्षेत्रांमध्ये करा व्यवसाय; लाखोंमध्ये कमाई हवामान विभागाने दिला महत्त्वाचा इशारा - भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 7 ऑक्टोबर 2022 व 10 ऑक्टोबर 2022 रोजी रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी 30-40 प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह व विजेच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी जनेतेने सावधनता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.