प्रतिनिधी, नयन शेट्टी, रायगड, 19 ऑगस्ट : हरिहरेश्वर इथे संशयित बोट सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर कोकणात आणि मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे. नाकाबंदीही पोलिसांकडून करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ आणखी एक बेवारस स्थितीत फुगा बोट आढळली होती. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे.
घातपाताचा संशय असल्याने या प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे देण्यात आला आहे. रायगढ संशयित बोट प्रकरणी ATS ने मोठी माहिती दिली आहे. बोटीमध्ये 2 तलवार आणि 2 चॉपरही मिळाले
आहेत. 3 AK47 आणि काडतूसं मिळाल्याचं पोलीसांनी सांगितलेलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बोट आली कशी याचा तपास सुरू आहे. फुगा बोटही सापडली त्याचा आणि या बोटीचं काही कनेक्शन आहे का? या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेल्याचा संशयही आहे. त्या अनुषंगाने चौकशी सुरू आली आहे.
चा बारकाईने तपास सुरू आहे, सर्व भागात नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्यासोबत को ऑर्डिनेशन सुरू आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
कालच्या घटनेनंतर आज रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी पोलिस आणि तपास यंत्रणा दाखल झाल्या आहेत. काल संध्याकाळी ATS आणि रात्री उशीरा NIA घटना स्थळी दाखल झाले. सदर बोट समुद्राच्या पाण्यातुन बाहेर काढणे शक्य नसल्याने रात्रभर 2 अधिकारी आणि 24 पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्ह्याच्या QRT ने आज सकाळी घटना स्थळाचा ताबा घेतला असुन डॉक्सस्कॉड मार्फत संशयीत बोटीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. घटना स्थळ म्हणजे हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर बघ्यांची रिघ वाढत असुन आता या ठिकाणी तपास यंत्रणां व्यतीरिक्त इतरांना प्रवेश निरर्बंधीत करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.