जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा मुंबईत, शिवसेना सहभागी होणार?

राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा मुंबईत, शिवसेना सहभागी होणार?

राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा मुंबईत, शिवसेना सहभागी होणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे. मुंबईमध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी ही यात्रा काढण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 सप्टेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे. मुंबईमध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी ही यात्रा काढण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचे समर्थक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप वगळता सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावं, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. शिवसेनेने काँग्रेसच्या या प्रस्तावावर सावध भूमिका घेतली आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. भारत जोडो यात्रेबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी काँग्रेस नेत्यांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे शिंदे आणि भाजपचंही लक्ष असणार आहे. महाविकासआघाडीच्या अस्तित्वाचंही अजून काही खरं नाही. आगामी निवडणुका तिन्ही पक्ष महाविकासआघाडी म्हणून लढणार का, हे अजूनही तळ्यात मळ्यात आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हिंदुत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात