जुन्नर, 17 एप्रिल : लोकप्रतिनिधींचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे ते आपल्या मतदारसंघातील किंवा इतरही लग्न समारंभात सहभागी होत असतात. अशाच एका लोकप्रतिनिधीने एका लग्नसमारंभात सहभागी होत चक्क ठेका धरला आहे. हे लोकप्रतिनिधी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे आहेत. डॉ. अमोल कोल्हे लग्नात ठेका धरतात तेव्हा - शिरूरचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा एका लग्नातील डान्स करतानाचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी पीएचे नारायणगाव येथे लग्न होते. या लग्नात नवरदेवासोबत डॉ. कोल्हे यांनी ताशा, हलगी आणि पिपाणीच्या नादावर चांगलाच ठेका धरला.
डॉ. अमोल कोल्हे यांचा एका लग्नातील डान्स प्रचंड व्हायरल, ग्रामीण वाद्यांच्या तालावर धरला ठेका pic.twitter.com/X9TQgBLGDy
— News18Lokmat (@News18lokmat) April 17, 2022
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉ. कोल्हे बैलगाडा घाटात घोडीवर बसले होते. त्यावेळी ते चर्चेत आले होते. त्यानंतर आज या लग्नात त्यांनी जो ठेका धरला तो चांगलाच चर्चेत आला आहे. बैलगाडा घाटात आणि लग्नात वाजवली जाणारी ग्रामीण संस्कृतीची वाद्य जेव्हा वाजली तेव्हा भल्याभल्यांच्या अंगात संचार येतो. त्यात अमोल कोल्हे सुद्धा अपवाद ठरले नाहीत. डॉ. कोल्हे यांनाही ठेका धरण्याचा मोह झाला असेलच. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांनी ग्रामीण वाद्यांच्या तालावर ठेका धरला. नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे सापडले होते वादात… दोन महिन्यांपूर्वीच डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे एकच वाद पेटला होता. ‘व्हाय किल आय गांधी’ या सिनेमात (Why i killED Gandhi) नथुराम गोडसेची (nathuram godse) भूमिका साकारल्यामुळे वादंग निर्माण झाला होता. यावर, माझ्या भूमिकेमुळे अनेक तरुणाच्या भूमिका दुखावल्या गेल्या होत्या. या सिनेमाच्या निमित्ताने अनेक गांधीवादी विचारवंताच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी खेद आणि दिलगिरी व्यक्त करतो, असं अमोल कोल्हे म्हणाले. हेही वाचा - शरद पवार-राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद; प्रकरणात लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा? तसंच, ‘नथुरामची भूमिका केली. पण ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात नाही. एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे, असंही कोल्हे म्हणाले.