सातारा, 13 सप्टेंबर : शिवाजीराजे भोसले यांचं वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालं. आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शिवाजीराजे भोसले हे कै.अभय सिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. याशिवाय उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. आज रात्री शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव अदालत वाड्यात आणण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्यावर संगम माहूली येथील कैलाश स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सायंकाळी साधारण साडे पाचच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बातमी अपडेट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.