पुणे, 28 जून : डॉ.प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचे (hairy cell leukemia Blood Cancer) निदान झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी (13 जून) समोर आली होती. त्यानंतर त्यांना पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. मात्र आताच हाती आलेल्या बातमीनुसार, काल 27 जून रोजी प्रकाश आमटेंना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या 5 दिवसांपासून त्यांचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. त्याशिवाय तापही खूप आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली.
काय आहे ती फेसबुक पोस्ट...
बाबांना काल परत admit केले आहे. आता सर्व visitors ना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. Dinanath Mangeshkar Hospital Pune येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला.
- अनिकेत आमटेबाबा आमटेपासून घेतला समाजसेवेचा वसा..
गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट जंगलात अतिदुर्गम अशा भामरागडच्या हेमलकसात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींच्या जीवनाला आधार देणाऱ्या सेवेच्या प्रकल्पाला गेल्या डिसेबर महिन्यात 48 वर्ष पूर्ण झाले आहेत. या सेवेने आता 49 व्या वर्षी पदार्पण केले. दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या प्रेरणेतून उभ्या असलेल्या या प्रकल्पातून डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटेंसह आमटे कुटुंबियांची चौथी पीढी या प्रकल्पातून आरोग्य, शिक्षण, शेती या कार्याच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.