जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / PM Narendra Modi speech: पुण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीत भाषण, काय म्हणाले मोदी

PM Narendra Modi speech: पुण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीत भाषण, काय म्हणाले मोदी

PM Narendra Modi speech: पुण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीत भाषण, काय म्हणाले मोदी

PM Narendra Modi: आज पुण्यात (Pune) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 06 मार्च: आज पुण्यात (Pune) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन झालं आहे. सुरुवातीला पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झालं. त्यानंतर MIT कॉलेजमध्ये मोदींची सभा पार पडली. यासभेत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली आहे. मोदींनी मराठीत म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले, महर्षी कर्व्हे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यातील माझ्या बंधु-भगिणींना नमस्कार करतो. देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तीर साजरी करतो आहे. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये पुण्याचं योगदान ऐतिहासिक राहिलं आहे. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपाळकृष्ण देशमुख यासारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानींना आदरपूर्वक नमन करतो. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित राहिलेल्या रामभाऊ म्हाळगींची पुण्यतिथी देखील आहे. बाबासाहेब पुरंदरेंचीही मी आठवण काढतो आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचा शुभारंभ, पायाभरणी कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासह पिंपरी-चिंचवडच्या महापौर आणि इतर नेते देखील उपस्थित होते. भाषणा दरम्यान काय म्हणाले पंतप्रधान मोदी काही वेळापूर्वीच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मला मिळालं. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी तुम्ही मला बोलावलं होतं. तसेच आज लोकार्पणासाठीही मला संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल मी आभार मानतो. पुढे मोदी म्हणाले की,आधी भूमीपूजन झाल्यावर कळायचंच नाही की कधी उद्घाटन होणार आहे. हे यासाठी महत्त्वाचं की, वेळेवर प्रकल्प पूर्णत्वास नेले जाऊ शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

जाहिरात

येत्या काळामध्ये मेट्रो रेल्वेचं महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी मेट्रोचा वापर करण्याचं आवाहन यावेळी मोदींनी केलं आहे. काही वेळापूर्वी मी मेट्रोने प्रवास केला. ही मेट्रो प्रवास सोपा करेल, प्रदुषणापासून मुक्तता करेल. कोरोना साथीदरम्यानही मेट्रो सेवेसाठी तयार आहे. आपल्या देशात गतीने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत आपली शहरी लोकसंख्या 60 कोटींच्या पार जाईल, असंही ते म्हणालेत. आज देशात दोन डझनाहून अधिक शहरांमध्ये मेट्रो एकतर सुरु झाली आहे अथवा तिचं काम सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रात पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, ठाणेमध्ये मेट्रोचा विस्तार होत असल्याचं मोदींनी म्हटलं. मेट्रोनं प्रवास करण्याची सवय लावून घ्या. तुम्ही जितका प्रवास मेट्रोमधून कराल, तेवढी तुम्ही आपल्या शहराची मदत कराल, असंही त्यांनी म्हटलं आहे. मेट्रोतून प्रवास करणं शहराला एक प्रकारे मदत करण्यासारखं आहे. 21 व्या शतकातील शहरांच्या गरजा आणि विकास लक्षात घेऊन सरकार त्याप्रकारे धोरण आखत असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. सरकार अधिकाधिक ई-वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत असून अत्याधुनिक पद्धतीनं घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था, बायोगॅस प्लांट, स्मार्ट एलईडी बल्बचा अधिक वापर व्हावा यासाठीच्या धोरणांवर सरकारकडून काम सुरू असल्याचंही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं आहे.

आज मुळा-मुठासाठी 1100 कोटींच्या प्रोजक्टवर काम सुरु होत असल्याचं त्यांनी भाषणात नमूद केलं. आज पुण्याला ई-बसेसही मिळत आहेत. आज पुण्याच्या विविधता पूर्ण आयुष्यात एक सुंदर भेट मिळाली आहे. ती म्हणजे आर के लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्याला प्राप्त झाली असल्याचंही ते म्हणालेत. पुणे वासियांचं मी खूप अभिनंदन करतो. मी दोन्ही महापौरांना, त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप सदिच्छा देतो. पुणे आपल्या सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच राष्ट्रभक्तीसाठी प्रसिद्ध राहिलं आहे. सोबतच पुणेनं शिक्षण, रिसर्च आणि डेव्हलपमेंट, आयटी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली असल्याचं म्हणत आमचं सरकार पुणेवासियांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकल्पांवर काम करत असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात