जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : वर्गमित्रानं केला विश्वासघात! ब्लॅकमेल करत विवाहित तरुणीसोबत केलं धक्कादायक कृत्य

Pune : वर्गमित्रानं केला विश्वासघात! ब्लॅकमेल करत विवाहित तरुणीसोबत केलं धक्कादायक कृत्य

Pune : वर्गमित्रानं केला विश्वासघात! ब्लॅकमेल करत विवाहित तरुणीसोबत केलं धक्कादायक कृत्य

Pune crime: आरोपी अविनाश करगळ आणि पीडित तरुणी औरंगाबाद येथे एमसीएचे शिक्षण घेत होते. याचदरम्यान, त्यांची ओळख झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 4 जून : दिवसेंदिवस अत्याचाराच्या (Physical Abused) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बलात्काराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे (Pune) शहर हादरलं आहे. काय आहे घटना ? औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने 26 वर्षीय नवविवाहित तरुणीवर बलात्कार (Physical Abused on Newly Married Woman) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अविनाश पांडुरंग करगळ (वय - 26, रा. चांदोर, ता. भूम, जि. उस्मानाबाद), असे आरोपीचे नाव आहे. त्याने या पीडितेवर बलात्कार करुन तिचे अश्लिल फोटोही काढले. तसेच ते तिच्या पतीला पाठवून तिची बदनामीही केली. प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) तक्रार दिली. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वाकडच्या हॉटेलमध्ये नेले आणि…. आरोपी अविनाश करगळ आणि पीडित तरुणी औरंगाबाद येथे एमसीएचे शिक्षण घेत होते. याचदरम्यान, त्यांची ओळख झाली. त्यानंतर एमसीएच्या तीन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी हिंजवडीतील एका कंपनीत गेले होते. त्यामध्ये आरोपी अविनाश आणि पीडित तरुणीचाही सहभाग होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच अविनाशने या विवाहित तरुणीला वाकड येथील एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दोघांचे अश्लिल फोटोही काढले. तसेच ते फोटो पीडित तरुणीच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले Dhule Crime : पत्नीचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध, पतीला कळल्यावर त्याने उचललं टोकाचं पाऊल या प्रकरणात पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) तक्रार दिली. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विवाहित तरुणीवर बलात्कार केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात