पुणे, 06 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं (Chhatrapati Shivaji Maharaj) अनावरण केलं आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , अजित पवार, सुभाष देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करण्यात आला. वादग्रस्त ठरलेला फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मुर्ती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करण्यात आला. मात्र 60 वर्षानंतर पुणे महापालिकेत पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर येणारे दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 60 वर्षांपूर्वी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी पुणे पालिकेलाभेट दिली होती. मोदी यांच्याआधी नेहरू यांनी पुणे पालिकेला भेट दिल्याच्या आठवणींना या निमित्तानं उजाळा मिळाला. नेहरू हे 1955 मध्ये पुण्यात आले होते.
Prime Minister Narendra Modi unveils the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at the premises of Pune Municipal Corporation
— ANI (@ANI) March 6, 2022
Maharashtra Governor Bhagat Singh Koshiyari and Pune Mayor Murlidhar Mohol also present pic.twitter.com/Nr6tBYct8H
60 वर्षांपूर्वी पंतप्रधान पंडित नेहरू हे पानशेतचे धरण फुटल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्यात आले होते. त्या वेळी ते पुणे महापालिकेत गेले होते. त्यावेळी तत्कालीन महापौर राजाभाऊ तेलंग यांनी त्यांच्यासाठी राजभवन येथे भोजन ठेवलं होतं.
On landing in Pune, PM @narendramodi unveiled a statue of Chhatrapati Shivaji Maharaj. pic.twitter.com/0zKyhORNRI
— PMO India (@PMOIndia) March 6, 2022
पानशेत पूर आणि काँग्रेसचे अधिवेशन या दोन्ही वेळी रोहिदास किराड पुण्याचे महापौर होते. पुराची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नेहरू यांनी पुणे महापालिकेला भेट देत पालिकेच्या सभागृहात पूरस्थितीची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण पुण्यातून उघड्या जीपमधून पूरस्थितीची पाहणी केल्याची माहिती आहे.