जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राजीव सातव यांच्या मृत्यूचं कारण ठरलेला 'सायटोमेगॅलो व्हायरस' नेमका काय आहे?

राजीव सातव यांच्या मृत्यूचं कारण ठरलेला 'सायटोमेगॅलो व्हायरस' नेमका काय आहे?

 राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचं पुण्यातील जाहंगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. सातव यांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या शरिरात सायटोमॅगलो व्हायरस (cytomegalovirus) देखील आढळला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 मे : काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचं पुण्यातील जाहंगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. (Congress mp Rajiv Satav passed away due to Covid-19) ते  मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. सातव यांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या शरिरात सायटोमॅगलो व्हायरस (cytomegalovirus) देखील आढळला. काय आहे सायटोमॅगलो व्हायरस? सायटोमॅगलो व्हायरस हा एक संसर्गजन्य आजार आहे. ‘बीबीसी मराठी’ नं दिलेल्या वृत्तानुसार गरोदर महिलांमध्ये या आजाराचा प्रमाण जास्त असतं. यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता देखील जास्त असते. तसंच एचआयव्ही ग्रस्तांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आढळतं. या व्हायरसच्या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकते. तसंच रॅटिनावर देखील परिणाम होतो. काही जणांच्या  फुफ्फुसात देखील याचं इन्फेक्शन होतं. त्याला सीएमई न्यूमोनिया असंही म्हणतात. या आजारामुळे रुग्णांना डायरियाचा त्रास होणे तसंच मेंदूमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. व्हायरसचा संसंर्ग कसा होतो? या व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याची याची लागण होते. संक्रमित रुग्णाची लाळ, रक्त आणि लघवीतून पसरतो. स्तनपान करणाऱ्या आईपासून बाळाला देखील याची लागण होऊ शकते. नवजात बाळ तसंच लहान मुलांमध्ये हा आजार जास्त आढळत असला तरी ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा प्रौढ व्यक्तींना देखील याची लागण होऊ शकते अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रौढांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कोव्हिड सारख्या आजारामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानं याचा मेंदू, डोळे आणि फुफ्फुसांवर परिणाम होण्याची शक्यता असते. राजीव सातव यांना झाली होती लागण राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. त्यातच त्यांना सायटोमॅगलस व्हायरसची लागण झाल्यानं त्यांची प्रकृती खालावली. राजीव सातव हे हिंगोलीचे माजी खासदार होते. 2014 साली मोदी लाटेत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या 2 खासदारांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्याकडं गुजरात राज्याचं काँग्रेस प्रभारी पद होतं. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात