पुणे, 2 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनावरही (Mahaparinirvana Day 6th December) ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरियंटचं सावट घोघावतंय. म्हणूनच आंबेडकरी अनुयायांनी 6 डिसेंबर (Dr. Babasaheb Ambedkar 64th Death Anniversary) रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर दर्शनाला गर्दी करणं टाळावं, असं आवाहन दस्तूरखुद्द बाबासाहेबांचे वंशज आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दादरच्या चैत्यभूमीवर दर्शनाला जावं की नाही, यावरून शेकडो अनुयायांकडून बाळासाहेबांकडे विचारणा होत होती, त्यानंतर आंबेडकरांनी यंदाच्या महापरिनिर्वान दिनी हा आपआपल्या घरीच महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन केलंय.
याबाबत अधिक माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) दिनी मुंबईला यावं की नाही अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या variant बद्दल अंदाज कोणालाही येत नाहीये. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं माझं आवाहन आहे.
आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया. दरम्यान, राज्य शासनासोबतच मुंबई महापालिकेनंही यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना आपापल्या घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.
हे ही वाचा-Pune School: पुण्यातील शाळा बंदच राहणार, जाणून घ्या शाळा सुरू होण्याची नवी तारीख
तसेच चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकात आदरांजली वाहण्यासाठी येणारे नेतेमंडळी आणि मान्यवरांनीही लशीचे दोन डोस घेतलेले असावे असे बंधनकारक करण्यात आले आहे. जर जवळ लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. राज्य सरकारने यंदाच्या ६ डिसेंबर, या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल्स लावता येणार नाहीत.
दरवर्षी 6 डिसेंबर रोजी दादरच्या चैत्यभूमीवर महामानवास अभिवादन लाखोंचा जनसमुदाय लोटतो. पण कोरोनाची साथ आल्यापासून महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादनावर काहिशा मर्यादा आल्यात. यंदाही शासनाने पूर्ण बंदी घातलेली नाही पण कोरोनाच्या लसीचं प्रमाणपत्र बाळगणं मात्र अनिवार्य केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.