मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! नोकरीच्या अमिषाने तरूणीवर बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ

धक्कादायक! नोकरीच्या अमिषाने तरूणीवर बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ

नोकरी देण्याच्या आमिषाने कंपनी मालकाने एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

नोकरी देण्याच्या आमिषाने कंपनी मालकाने एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

नोकरी देण्याच्या आमिषाने कंपनी मालकाने एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 03 फेब्रुवारी : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागच्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच बलात्काराची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने कंपनी मालकाने एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बलात्कार करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी ही दिली आहे.

दरम्यान पिडीतेकडून पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला असता, कंपनीच्या मालकाच्या मित्राने तिचा खून करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना पुण्यातील खेड तालुक्याच्या महाळुंगे हद्दीत घडली आहे. कंपनीचा मालक विजयकुमार जनार्दन पोतदार (वय 55, रा. संकेश्वर डाईन आयकॉन, रावेत, पुणे) साथीदार मिथुन गेंदकुमार दास (वय 28, सारा सिटीसमोर, खराबवाडी, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

हे ही वाचा : pune koyata gang : कोयता गँगचा मोठा कट उधळला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी नोकरीच्या शोधात होती. तिच्या मैत्रिणीने तिला विजयकुमार पोतदारच्या कंपनीबद्दल माहिती दिली. त्यानुसार फिर्यादीने विजयकुमारशी संपर्क साधून नोकरीची गरज असल्याचे सांगितले.

मात्र, विजयकुमारने कामाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले. तसेच, 'मोबाईलमध्ये तुझे फोटो आहेत, ते मी व्हायरल करीन,' अशी धमकी दिली. त्यानंतर विजयकुमार हा वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून, तसेच वेगवेगळ्या लोकांमार्फत फोन करून फिर्यादीला त्रास देऊ लागला.

हे ही वाचा : Pune Police Arrest Theft : स्वत:च्या मृत्यूचा बनाव; वर्षभर पोलिसांना फसवलं, अखेर सत्य आलं समोर, पुणे पोलिसांची कारवाई

फिर्यादीने तुझी पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे विजयकुमारला सांगितले. त्यावर विजयकुमारने त्याचा मित्र मिथुनला फिर्यादीचा मोबाईल नंबर दिला. मिथुनने फिर्यादीस फोन करून 'विजयकुमारबरोबर काय केले आहे, मला माहीत आहे. तू जर त्याच्याविषयी कोणाला काही सांगितले. तर, तुझा खून करीन,' अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune (City/Town/Village), Pune crime news, Rape accussed, Rape case, Rape news