मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /pop ganeshmurti ban : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काही तासांआधी कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, 'या' मुर्तींवर सरसकट बंदी

pop ganeshmurti ban : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काही तासांआधी कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, 'या' मुर्तींवर सरसकट बंदी

राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गणपती उत्सवासंदर्भात जे अस्थाई धोरण जाहीर केले आहे.  (pop ganeshmurti ban)

राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गणपती उत्सवासंदर्भात जे अस्थाई धोरण जाहीर केले आहे. (pop ganeshmurti ban)

राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गणपती उत्सवासंदर्भात जे अस्थाई धोरण जाहीर केले आहे. (pop ganeshmurti ban)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 ऑगस्ट : राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गणपती उत्सवासंदर्भात जे अस्थाई धोरण जाहीर केले आहे.  (pop ganeshmurti ban) त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणाचे तंतोतंत पालन करण्याचे गणेश मंडळ व सर्व नागरिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गणेश उत्सव साजरा करताना पीओपी मुर्त्यांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.

गणपतीचे अवघ्या काही तासात आगमण होणार असताना नागपूर खंडपिठाने पीओपी गणपती वापरण्यास बंदी घातली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गणपती उत्सवासंदर्भात जे अस्थाई धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणाचे तंतोतंत पालन करण्याचे गणेश मंडळ व सर्व नागरिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गणेश उत्सव साजरा करताना पीओपी मुर्त्यांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : शहाजीबापू म्हणतात 'महाराष्ट्रात तो विक्रम माझ्या नावावर; उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..'

मुंबई महापालिकेची पीओपी गणपती मूर्तींना परवानगी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि गणेशोत्सव समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रशासनाकडून यावर्षीपुरती 'पीओपी'च्या मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. शिवाय करोना आटोक्यात असल्यामुळे निर्बंध नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात आणि निर्विघ्न साजरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा : शिवसेना दसरा मेळाव्याचा वादात आता मनसेची उडी, राज ठाकरे घेणार का मेळावा?

गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात पालिकेचे उपायुक्त व गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, 'एस'विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी 'पी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह मुंबई पोलिस दलाचे अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी, मुंबई उपनगरे गणेशोत्सव समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

First published:
top videos

    Tags: Ganesh chaturthi, High Court, Mumbai