पुणे, 23 फेब्रुवारी: पूजा चव्हाण मृत्यू (Pooja Chavhan) प्रकरणाला आज सोळा दिवस झाले आहेत. मात्र तरीही तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पंधरा दिवसानंतर वृत्तमाध्यमांपुढे आले होते. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करून पोहरादेवी गडावर मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे.
संजय राठोड यांनी आपली बाजू मांडल्यानंतर, पूजा चव्हाण यांच्या नातेवाईक शांताताई राठोड यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या यावेळी म्हणाल्या की, संजय राठोड यांचा हा सोहळा बंजारा समाजाची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा मी देतच राहणार आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही पूजाच्या नातेवाईक शांताताई राठोड यांनी केली आहे.
शिवाय पूजाला जर न्याय मिळाला नाही, तर मंत्रालयावर धडक आंदोलन काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता वेगळ वळण लागलं असून हे प्रकरण आणखी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्रातील अनेक विरोध पक्षातील नेत्यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी होती. ती एक TikTok स्टार होती. सोशल मीडियावर तिचे बरेच चाहते होते. पूजाला बंजारा समाजाच्या विकासासाठी काहीतरी भरीव कामगिरी करायची होती. आपली इंग्रजी भाषा फारशी चांगली नाही, यामुळे ती इंग्रजी शिकण्यासाठी पुण्यात आली होती. इंग्रजी आलं तर आपण जग जिंकू आणि आपली छाप पाडू असं तिला वाटायचं. पण पुण्यात आल्यानंतर दोन आठवडेही झाले नसतील तोच तिने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीच्या बाल्कणीतून उडी घेवून आत्महत्या केली होती.
हे ही वाचा-'मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका ...
तिच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातील संवादावरून पूजाचे कथित मंत्र्यांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निर्माण झाला आहे. हा कथित मंत्री शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हे आहेत, असा आरोप विरोध पक्षांनी केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण बरंच तापलं होतं. घटनेच्या 15 दिवसांनंतर संजय राठोड यांनी आज सकाळी त्यांची भूमिका मांडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pooja Chavan, Sanjay rathod