शरद पवारांबाबत आक्षेपार्ह प्रतिक्रिया, टीकेनंतर चारोळीकारांनी मागितली माफी

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह प्रतिक्रिया, टीकेनंतर चारोळीकारांनी मागितली माफी

चंद्रशेखर गोखले यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर गोखले यांनी अखेर माफीनामा सादर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेमुळे चंद्रशेखर गोखले यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर गोखले यांनी अखेर माफीनामा सादर केला आहे.

'न्यूज 18 लोकमत'ने शरद पवार यांच्याबाबतची एक बातमी दिल्यानंतर त्या बातमीखाली फेसबुकवर चंद्रशेखर गोखले यांनी खालच्या पातळीवरील कॉमेंट केली होती. त्यानंतर चंद्रशेखर गोखले यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्वीट करत चंद्रशेखर गोखले यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

दरम्यान, सोशल मीडियावर एखाद्याविषयी विकृत लिखाण करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशातच आता ज्यांच्याकडे कवी म्हणून पाहिलं जातं, अशा व्यक्तीकडूनही अशाच प्रकारचं लिखाण करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गोखले नेमकं काय म्हणाले?

'बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यानंतर शरद पवारांचं धक्कादायक विधान' या मथळ्याखाली 'न्यूज 18 लोकमत'ने दिलेल्या बातमीवर चंद्रशेखर गोखले यांनी 'मी वाचलं धक्कादायक निधन देव त्यांच्या आत्म्याला सॉरी सॉरी देव त्यांना उदंड आयुष्य देवो' असं विकृत भाष्य केलं होतं.

VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

First published: May 2, 2019, 9:27 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading