मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पंतप्रधान मोदी शुक्रवारी पुन्हा मुंबईत, 'वंदे भारत'सह मुंबईकरांना मिळणार एवढी गिफ्ट!

पंतप्रधान मोदी शुक्रवारी पुन्हा मुंबईत, 'वंदे भारत'सह मुंबईकरांना मिळणार एवढी गिफ्ट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईत येणार आहेत. शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईत येणार आहेत. शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईत येणार आहेत. शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईत येणार आहेत. शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण होणार आहे. याआधी 19 जानेवारीलाही पंतप्रधान मुंबईत आले होते, तेव्हा मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांशिवाय वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत ट्रेनच्या दोन मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी दोन वंदे भारत ट्रेन सुरू होत आहेत.

वंदे भारत ट्रेनशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचंही लोकार्पण करणार आहेत, ज्यामुळे मुंबईतली ट्रॅफिकची समस्या कमी व्हायला मदत होणार आहे. याशिवाय पंतप्रधान मुंबईत अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नव्या परिसराचंही उद्घाटन करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दोन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवतील. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचं लोकार्पण होईल. यानंतर संध्याकाळी 4.30 वाजता पंतप्रधान अल्जामिया-तुस-सैफियाहच्या भागाचं उद्घाटन करणार आहेत.

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेन शुक्रवारपासून नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. भारतामध्ये सुरू होणाऱ्या या 9व्या आणि 10व्या वंदे भारत ट्रेन असतील. मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर तसंच आळंदी या तीर्थक्षेत्राच्या पर्यटनाला चालना मिळेल, तसंच मुंबई-शिर्डी वंदे भारतमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर सारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्र रेल्वे संपर्कात येतील.

सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरा अंडरपासमुळे मुंबईतील ट्रॅफिकची समस्या कमी व्हायला मदत होईल. कुर्ला ते वाकोला आणि कुर्ला एमटीएनएल जंक्शन, बीकेसी ते एलबीएस फ्लायओव्हरपर्यंत एलिवेटेड कॉरिडोरमुळे शहराच्या पूर्व-पश्चिम भागाचा संपर्क आणखी चांगल्या प्रकारे होईल. हे रस्ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि इर्स्टन एक्सप्रेस हायवेला जोडतील. तर कुरार अंडरपास वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी तसंच मालाड आणि कुरारला जोडण्यासाठी महत्त्वाचा मानला जातोय. या मार्गामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या ट्रॅफिकची समस्या कमी व्हायला मदत होईल.

अल्जामिया-तुस-सैफियाह दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. सैयदाना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनात ही संस्था बोहरा समुदायाच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे.

First published:

Tags: Narendra Modi