Home /News /maharashtra /

भोसरीचे आमदार महेश लांडगे स्टेजवर थिरकले, झुंबा डान्सचा VIDEO VIRAL

भोसरीचे आमदार महेश लांडगे स्टेजवर थिरकले, झुंबा डान्सचा VIDEO VIRAL

सायक्लोथॉन स्पर्धेनंतर आमदार महेश लांडगे यांनी उपस्थितांचा उत्साह वाढविण्यासाठी ठेका धरला आहे.

पिंपरी चिंचवड, 17 जानेवारी : राजकीय व्यक्तीला कधी काय करावं लागेल याचा काही नेम नसतो. भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनाही आज याचाच प्रत्यय आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि सामाजिक संस्थाच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेनंतर आमदार महेश लांडगे यांनी उपस्थितांचा उत्साह वाढविण्यासाठी ठेका धरला आहे. विशेष म्हणजे आमदार लांडगे यांच्यासोबत स्थाई समिती अध्यक्ष संतोष लोंढे आणि नगरसेवकही स्टेजवर थिरकल्याचं पाहायला मिळालं. अर्थात महेश लांडगे करत असलेले हा नृत्युप्रकार केवळ करमणूक नसून झुंबा डान्स म्हणजेच शारीरिक व्यायाम म्हणून केलं गेलेलं नृत्य आहे. दरम्यान, पैलवान आमदार म्हणून ओळख असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी धरलेला ठेका अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आणि त्यामुळेच दिवसभर त्यांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरलही झाला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pimpari, Pimpari chinchavad

पुढील बातम्या