वाशिम, 5 जून : दिवसेंदिवस अत्याचाराच्या (Molestation) घटनांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. त्यातच आता विदर्भातील वाशिम (Washim) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. याठिकाणी रिसोडच्या इंगोले बाल रुग्णालयात (Risod Ingole Child Hospital) वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासल्याचा संतापजनक प्रकार घडला.
काय आहे प्रकरण?
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील इंगोले बाल रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली. या इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर येथील नराधम डॉक्टरने अत्याचार (Physical Abused on Nurse by Doctor) केला आहे. गोपाल इंगोले असे या नराधम डॉक्टरचे नाव आहे. वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नराधम डॉक्टरच्या विरोधात रिसोड पोलीस ठाण्यात अत्याचाराच्या गुन्ह्यासह वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रिसोडच्या इंगोले बाल रुग्णालय व प्रसूतिगृहामध्ये एक महिला 5 ते 6 महिने नर्सचे काम करत होती. या दरम्यान डॉक्टरने त्या महिलेवर वारंवार अत्याचार केले. या धक्कादायक प्रकारामुळे ही महिला गर्भवती राहिली. यानंतर या महिलेला गर्भपात करायला लावला. हा गर्भ तिच्या नवऱ्याने पुरला होता. पीडित महिलेने रिसोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी नराधम डॉक्टरविरोधात अत्याचाराच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धक्कादायक! माफी मागून माहेराहून परत आणलं; मग रस्त्यातच दाताने चावा घेत तोडलं पत्नीचं नाक
दरम्यान, या महिलेचा गर्भपात झाला असून पोलिसांनी तो पुरलेला गर्भ बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणी साठी पाठविला आहे. डॉक्टरने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिल्यामुळे या डॉक्टरवर उपचार सुरू आहेत. गर्भाचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर डीएनए वरुन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकूर यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.