पश्चिम घाट म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं निसर्ग संपन्न वैभव आहे. पश्चिम घाटात पावसाळ्यात दिसणारी हिरवीगार दृश्ये सर्वांनाच भूरळ पाडतात. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील निसर्गाच्या या अद्भुत नजाऱ्याची ही सुंदर छायाचित्रे खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी…
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातून दिसणारे हे विलोभनीय दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारे आहेत. हे फोटो पाहुन आपल्यालाही कोकणात जाण्याची इच्छा होईल.
आकाशाला टेकणाऱ्या टेकड्या, त्यातून पांढराशुभ्र ओथंबणारा धबधबा ही सर्व दृश्ये निसर्गाची किमया दाखवून जातात.
संबंध पर्वताने नेसलेला हिरवा शालू आणि या घाटाची शोभा वाढवणारी नागमोडी वळणं, हे सगळं मनाला विलक्षण सुख देणारं आहे.
रोजच्या ताणतणावातून अशा प्रकारचा निसर्गाचा सुंदर नजारा पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं, मात्र निसर्ग असाच अबाधित राखण्यासाठी देखील सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे.