मुंबई, 18 नोव्हेंबर : राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मनसेसह भाजप नेतेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनी पंडित नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप केले आहेत. या आरोपामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नेहरूंना हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काय म्हणाले रणजीत सावरकर? नेहरू यांनी एका बाई साठी देशाची फाळणी केली असा आरोप रणजीत सावरकरांनी केला आहे. भारत सरकारने ब्रिटिश सरकारकडून पामेला आणि नेहरूंचे पत्र बाहेर काढून प्रसिद्ध करावे असंही ते यावेळी म्हणाले. नेहरूंनी कोणालाही न विचारता अगदी काँग्रेस नेत्यांना अंधारात ठेवून देशाची फाळणी केली. पामेला ही लॉर्ड माऊंटबेटन यांची मुलगी आहे. लॉर्ड माऊंटबेटन हे पत्नीकरवी नेहरूंकडून काम करवून घेत होते. या प्रेम प्रकरणाचा परिपाक म्हणून देशाची फाळणी झाली असा गंभीर आरोप सावरकरांनी यावेळी केला आहे. यावर राहूल गांधीनी उत्तर द्यावं.
रणजित सावरकरांचे नेहरूंवर गंभीर आरोप. म्हणाले, 'भारताची फाळणी एका बाईमुळे....'#Savarkar #RahulGandhi pic.twitter.com/iCB2n5I8SC
— News18Lokmat (@News18lokmat) November 18, 2022
नेहरू हे माऊंटबॅटनच्या हाताचा खुळखुळा बनले होते. नेहरू हे रात्री दोननंतर माझ्या आईला पत्र लिहायचे असंही पामेला यांनी एका पुस्तकात लिहिल्याचा उल्लेख सावरकर यांनी केला आहे. माऊंटबॅटनच्या पत्नीसोबत संबंध असल्याचंही धक्कादायक आरोप यावेळी सावरकरांनी केला आहे.