प्रतिनिधी विशाल माने, परभणी, २६ ऑगस्ट : बॅटमिंटन खेळण्यासाठी आलेला अचानक एक व्यक्ती खाली कोसळला. नक्की काय झालं हे तिथल्या लोकांनाही समजलं नाही. उपस्थितांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाल्याची घटना परभणीतून समोर आली आहे. परभणी शहरातील 44 वर्षीय व्यापारी सचिन तापडिया बॅटमिंटन खेळण्यासाठी कोर्टवर आले. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
VIDEO| ब्रेकअप केल्याच्या रागातून पेट्रोलपंपावर तरुणीवर जीवघेणा हल्ला44 वर्षीय सचिन तापडिया हे, रोज बॅडमिंटन खेळण्यासाठी परभणीच्या बॅडमिंटन हॉलला येत होते. सकाळी बॅडमिंटनचा पहिला राऊंड पूर्ण केल्यानंतर ते खर्चीवर बसायला जात होते. ते पाणी पित असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, मुलगी आणि पत्नी आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.